शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

जागतिक मेंदू दिन : गावखेड्यांमध्ये वाढतोय पार्किन्सनचा आजार : चंद्रशेखर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 9:18 PM

पार्किन्सनचा आजार सर्वच वयोगटात दिसून येतो. परंतु ६० वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला हा आजार होतो. भारतात या आजाराचे सहा ते सात लाख रुग्ण आहेत. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदहा वर्षाने आजार दुपटीने वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पार्किन्सनचा आजार सर्वच वयोगटात दिसून येतो. परंतु ६० वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला हा आजार होतो. भारतात या आजाराचे सहा ते सात लाख रुग्ण आहेत. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण दीडपटीने जास्त आहे. धक्कादायक म्हणजे, हा आजार गावातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असल्याची माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीतर्फे २२ जुलै हा दिवस वार्षिक जागतिक मेंदू दिवस म्हणून पाळला जातो. या वर्षी हा दिवस पार्किन्सन आजाराची जनजागृती व रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे. या कार्यात १२६ हून अधिक जागतिक संघटना सहभागी आहेत.डॉ. मेश्राम म्हणाले, पार्किन्सन हा एक मेंदूचा आजार आहे. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर प्रभाव पाडतो. पार्किन्सन ही जागतिक समस्या आहे. जागतिक मेंदू दिनाचे अध्यक्ष प्राध्यापक टिसा विजरतने यांनी स्पष्ट केले की, ‘पार्किन्सन’ने जगभरातील सात दशलक्षाहूनही अधिक लोकांना प्रभावित केले आहे. यामुळे आजाराची जनजागृती होणे व रुग्णांना उपचाराखाली आणणे आवश्यक आहे.२५ टक्के रुग्णांचे चुकीचे निदानडब्ल्यूएफएनचे सरचिटणीस प्रा. वोल्फगँग ग्रिसोल्ड म्हणाले, पार्किन्सन आजाराची सुरुवातीला लक्षणे ओळखू येत नाहीत. त्यामुळे २५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे होते. डब्ल्यूएफएनचे अध्यक्ष प्रा. विल्यम कॅरोल म्हणाले, मेंदूचे आरोग्य यापूर्वी कधीही इतके महत्त्वाचे नव्हते जेवढे आज आहे. प्रा. कॅरोल म्हणाले, पार्किन्सन रोगावर एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे.पार्किन्सनची लक्षणेपार्किन्सन आजाराची विशिष्ट लक्षणे म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. याशिवाय झोप आणि संज्ञानात्मक क्षमतेमध्ये व्यत्यय येणे, पोटाचे विकार, बद्धकोष्ठपणा, चिंता आणि नैराश्य. या लक्षणांमुळे जीवनाची गुणवत्ता कमी होते. लवकर निदान आणि प्रभावी उपचार केल्यास रुग्णांना आराम मिळतो. जीवनमान चांगले होते.उपचाराच्या पर्यायांवर चर्चानागपूर न्यूरो सोसायटी, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, मानसोपचार संस्था, नागपूर आणि सप्तक संघटनेच्यावतीने ६ ते ७. ३० दरम्यान डॉ. मेश्राम, डॉ. ध्रुव बत्रा, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या उपचाराच्या पर्यायांवर चर्चा करतील. आहार सल्लागार जयश्री पेंढारकर या रुग्णांना योग्य आहाराबद्दल सल्ला देतील आणि फिजिओथेरपिस्ट डॉ. शीतल मुंदडा व्यायामाचे महत्त्व विशद करतील. न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. लोकेंद्रसिंह, डॉ. श्याम बाभुळकर, डॉ. नितीन चांडक हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य