लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जागतिक वसुंधरादिनाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम होत आहेत. पर्यावरण प्रेमी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद करीत आहेत. या सर्व मोठ्या कार्यक्रमांमध्ये नागपुरातील विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपने आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.शहरातील सिव्हील लाईन्स या भागात साकेत, अभिनव, समीक्षा, अंतरिक्ष आयुष ही तरुण मंडळी रस्त्याच्या कडेला हाती कागदी फलक घेऊन उभी ठाकली होती. येणारे जाणारे त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. असं पाहणारा वाटसरू दिसला की ही मुलं त्याला वृक्ष रोपण करा असं सांगतानाच त्यांच्या हातात एक लहानसे रोपटे ठेवीत आहेत. अशी किमान ५० रोपटी त्यांनी वाटली होती.. कसा काय प्रतिसाद आहे, असं विचारलं तर खूपच छान प्रतिसाद आहे असं सांगतात.उन्हाळ््याच्या सुट्ट्या लागल्यात. परिक्षा संपल्या आहेत. काहीतरी विधायक करावं असं त्यातल्या सर्वांनाच वाटत होतं. त्यातून ही संकल्पना पुढे आली असं समीक्षा सांगते. हा आमचा काही रजिस्टर्ड ग्रूप नाही. आम्ही असंच एकत्र येऊन काम करत आहोत अशी माहिती ती पुढे देते.येत्या काही दिवसात नागपुरातील कचरा काही अंशी तरी साफ करण्याचा या तरुण चमूचा इरादा आहे. रस्त्यावर पडलेला कचरा साफ करणार असल्याचा निर्धार ते पुढे बोलून दाखवतात.
जागतिक वसुंधरा दिन; विद्यार्थ्यांनी वाटली मोफत रोपटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 3:10 PM
जागतिक वसुंधरादिनाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम होत आहेत. पर्यावरण प्रेमी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद करीत आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये नागपुरातील विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपने आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
ठळक मुद्देवर्गणी गोळा करून विकत घेतली रोपटीपहिल्याच प्रयत्नात ५० रोपट्यांचे वितरण