शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

जागतिक पर्यावरण दिन; पर्यावरणपूरक झाडे लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 10:50 AM

शतकोटी वृक्ष लागवडीपेक्षा पर्यावरणपूरक झाडे लावण्यावर भर द्यावा, असा सल्ला पर्यावरण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देतुळस गुणकारी कुठली झाडे लावावीत हे महत्त्वाचे

अंकिता देशकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने शतकोटी वृक्ष अभियान राबविले. गेल्या तीन चार वर्षात लावलेले किती वृक्ष जगले, वातावरणावर त्याचा किती परिणाम झाला? याचे कुठलेही माप शासनाकडे नाही. शतकोटी वृक्ष लागवडीपेक्षा पर्यावरणपूरक झाडे लावण्यावर भर द्यावा, असा सल्ला पर्यावरण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी दिला आहे.पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, विविध समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेऊन पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. वायू प्रदूषणाचा धोका वेगाने वाढतो आहे. त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर वायू प्रदूषणाचा धोका उच्चपातळीवर वाढला आहे. प्रदूषणामुळे होणारे विविध आजार, विकार देखील वाढले आहे. वायू प्रदूषणाला कारणीभूत म्हणजे वृक्षतोड. शहरांमध्ये विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासन वृक्ष लागवडीचे अभियान राबवित आहे. पण वृक्ष लागवड करताना झाडे कुठली लावावीत, हा देखील महत्त्वाचा भाग आहे.

ज्या झाडांवर पक्ष्यांची घरटी, ते झाड पर्यावरणाचे सोबतीज्या झाडांवर पक्ष्यांची घरटी आढळतात, ते झाड वायू प्रदूषणापासून बचाव करायला सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. या झाडांमध्ये पिंपळ, कडू लिंब, पळस, वड या झाडांचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीच्या वेळी झाडांचे महत्त्व सांगितले आहे. या मागचे कारण म्हणजे वर्षातून एकदा तरी आपण या झाडांच्या संपर्कात यावे.उंबर किंवा औदुंबराचे झाड अशा ठिकाणी वाढते जिथे पाणी खूप प्रमाणात असेल. या झाडाचे महत्त्व म्हणजे हे उष्णता कमी करते. शहरात बांधकामामुळे तापमान वाढले आहे. ते कमी करण्यासाठी या झाडांची लागवड महत्त्वाची ठरू शकते. त्याचबरोबर सप्तपर्णी आणि मेहंदीचे झाडदेखील उष्णता कमी करण्यात मदत करतात. त्या म्हणाल्या की तुळशीचे झाड हे सर्वात उपयुक्त आहे. तुळशीमुळे प्राणवायु आणि ओझोन जास्त प्रमाणात मिळतो. तुळस ही खूप लवकर वाढते आणि कुठेही लावता येते. गुलमोहर आणि चाफा हे झाड सुद्धा उन्हाळ्यात तापमान कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.- डॉ. माधुरी वाघ, द्रव्यगुण विभाग प्रमुख,शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

देशी झाड लावावीत - डॉ. विजय घुगेनिसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय घुगे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत नेत्रवान हा प्रकल्प उभा केला आहे. १००० हेक्टर नापिक जमिनीवर छोटे वन उभारले आहे. निसर्ग विज्ञान मंडळ ४५ गावांसोबत काम करत आहे. डॉ विजय घुगे यांनी रक्तचंदन या झाडाच्या प्रजातींवर काम केले आहे. हे झाड इलेक्ट्रॉनिक रेडिएशन शोषून घेते. ते म्हणतात की वातावरणाला साजेसे झाड ही देशीच असतात. तीच झाडे लावल्यास पर्यावरणाला पोषक ठरतील.

टॅग्स :World Environment DayWorld Environment Day