शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

नागपूरचे कनोजिया यांच्याकडे जगप्रसिद्ध महात्मा गांधींचा दुर्मिळ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 8:01 PM

महात्मा गांधी ही भारतातील एकमेव व्यक्ती होती, जी जगात सर्वात प्रसिद्ध होती. याची प्रचिती महालातील रूपकिशोर कनोजिया यांच्या झोपडीत येते. कनोजिया यांनी आपल्या झोपडीतच गांधीजींच्या दुर्मिळ साहित्याचा संग्रह केला आहे. जो नागपूरकरांसाठी अनोखा आहे. महात्मा गांधींची जगभरात असलेली कीर्ती याची जाणीव करून देणारा आहे.

ठळक मुद्दे११६ देशांची डाकतिकीटेदेशात महात्मा गांधीवर निघालेली पहिली नोटगांधीजींचा मूळ फोटोही संग्रहात

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी ही भारतातील एकमेव व्यक्ती होती, जी जगात सर्वात प्रसिद्ध होती. याची प्रचिती महालातील रूपकिशोर कनोजिया यांच्या झोपडीत येते. कनोजिया यांनी आपल्या झोपडीतच गांधीजींच्या दुर्मिळ साहित्याचा संग्रह केला आहे. जो नागपूरकरांसाठी अनोखा आहे. महात्मा गांधींची जगभरात असलेली कीर्ती याची जाणीव करून देणारा आहे.रूपकिशोर कनोजिया हे प्रसिद्ध संग्राहक आहे. त्यांच्या या संग्रहात महात्मा गांधी यांचा बहुमूल्य ठेवा बघायला मिळतो. रूपकिशोर यांच्या मते जगात ११६ देशांनी महात्मा गांधी यांच्यावर पोस्टाची तिकिटे काढली आहेत. यातील बहुतांश तिकिटे रूपकिशोर यांच्या संग्रहात आहेत. तीही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आईसलॅण्डने महात्मा गांधींवर प्लास्टिकचे थ्रीडी तिकीट काढले आहे. जर्मनीने गांधीजींवर काढलेले पोस्टकार्ड, इंग्लंडने काढलेले फर्स्ट डे कव्हर, संयुक्त राष्ट्र संघाने २ आॅक्टोबर अहिंसा दिवस घोषित केल्यानंतर २००७ मध्ये स्पेशल कव्हर काढले होते. या सर्व डाक तिकिटांसह भारतामध्ये महात्मा गांधींवर निघालेल्या पहिल्या दीड आण्याच्या पोस्टाच्या तिकिटापासून तर १०० रुपयाचे खादीचे डाकतिकीट त्यांच्याकडे बघायला मिळते. भारताने १९४८ मध्ये काढलेले गांधीजींचे पहिले तिकीट, दांडीयात्रा, जन्मशताब्दी वर्ष, मीठाचा सत्याग्रह या चळवळींवर काढलेल्या तिकीट, मिनिचरशीट व फर्स्ट डे कव्हर आहे. भारतीय डाक विभागाने महात्मा गांधीचे काढलेले पहिले पोस्टकार्ड, महात्मा गांधींवर आंतरदेशीय पत्र, विविध राज्याने काढलेले पोस्टकार्ड हे त्यांच्या संग्रहात बघायला मिळते.त्याचबरोबर महात्मा गांधींवर आजपर्यंत निघालेल्या सर्व नोटा. १९६९ मध्ये गांधी शताब्दी वर्षानिमित्त काढलेल्या १, २, ५, १० आणि १०० रुपयांच्या गांधींचा फोटो प्रिंट असलेल्या नोटा. खादी ग्रामोद्योगाने गांधीजींवर १९६१ मध्ये काढलेली २ रुपये व १० रुपयांची हुंडी. महात्मा गांधींजे दुर्मिळ व मूळ फोटो, चार्ली चॅप्लिनची गांधीजींशी भेट याचे मूळ फोटो त्यांच्या संग्रहात आहेत. १९७६ पासून रूपकिशोर महात्मा गांधींशी संबंधित वस्तूंचा संग्रह करीत आहे. बहुतांश कलेक्शन दुर्मिळ असल्याने त्यांची मागणी वाढली आहे.अमूल्य ठेवा आहेगांधीजींच्या कलेक्शनसाठी अख्खा देश फिरलो आहे. लाखो रुपये खर्च केले आहेत, तेव्हाच हा जगप्रसिद्ध ठेवा माझ्या संग्रहात आला आहे. तो माझ्यासाठी अमूल्य आहे.रूपकिशोर कनोजिया, संग्राहक

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर