लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भारतात ग्लॉकोमाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण ४० टक्के वाढले असून ही वाढती टक्केवारी आपल्या साधनांच्या दृष्टीने आव्हान ठरत आहे. ग्लॉकोमा (काचबिंदू) बाबतचे हे अनुभव सामाजात सामान्यपणे आढळून येतात. याचा उपचार करणाऱ्या डोळयांच्या तज्ज्ञांसाठी आणि ग्लॉकोमामुळे दृष्टी गमावलेल्या रुग्णांसाठीही हे दु:खदायी आहे. त्यामुळे ग्लॉकोमाच्या अनभिज्ञ परिणामाबाबत माहिती आणि जनजागृती परसविण्याच्या उद्देशाने १० मार्च ते १६ मार्च यादरम्यान वर्ल्ड ग्लॉकोमा विक साजरा करण्यासाठी जग एकत्रित आले आहे.ग्लॉकोमा काय आहे?हा डोळयांच्या आजारांचा समूह असून कुठलाही इशारा न देता दृष्टी हिरावून घेण्यास कारणीभूत ठरतो. आजाराच्या सुरुवातीच्या काळात कुठलेही लक्षण आढळून येत नाही. डोळयांच्या तंतूंना इजा पोहचून दृष्टी जाते. डोळयांतील मज्जातंतूचे कार्य लाखो तार जुळलेल्या विद्युत केबलप्रमाणे असते. ते डोळयांमधून मेंदूमार्फ त प्रतिमा तयार करण्यास कारणीभूत असतात. अनेकदा अॅडव्हान्स स्टेजला पोहचल्याशिवाय ग्लॉकोमाचे निदानही होत नाही. मात्र ग्लॉकोमामुळे दृष्टी गमावणे शाश्वत असल्याने या आजाराचे लवकरात लवकर निदान होणे तेवढेच आवश्यक आहे.ग्लॉकोमाची सद्यस्थिती काय?जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या रिपोर्टनुसार ४.५ लाख लोक ग्लॉकोमामुळे अंध झाले आहेत. संशोधनानुसार जगभरात दृष्टीदोष निर्माण करण्यामध्ये काचबिंदू हे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. भारतामध्ये १२ लाख लोक या आजाराने ग्रस्त असून त्यातील जवळपास १.२ लाख लोकांनी त्यामुळे दृष्टी गमावली आहे.ग्लॉकोमा बरा होणे शक्य आहे का?बहुतेक परिस्थितीत ग्लॉकोमा नियंत्रित ठेवता येतो पण त्यावर उपचारांची शक्यता कमी आहे. विशिष्ट वेळेनुसार वारंवार डोळयांची तपासणी करणे, सातत्याने दृष्टीचे निरीक्षण करणे, डोळयांच्या मज्जातंतुंद्वारे होणाऱ्या प्रतिमांचे अवलोकन, दिसणाºया दृश्याची तपासणी आणि इन्ट्रॉकुलर प्रेशरची नोंदणी करणे आवश्यक आहे.तुम्ही तुमची दृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, ग्लॉकोमा आजार धोकादायक स्थितीत पोहचण्यापूर्वी त्वरीत निदान आणि उपचार सुरू करणे हा या आजारावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे तुम्ही डोळयांच्या आजाराशी संबंधित उच्च जोखीम गटात आले असाल तर डोळयांच्या तज्ज्ञांकडून दर दोन वर्षांनी डोळयांची बाहुली तपासणे आवश्यक आहे.
जागतिक ग्लॉकोमा सप्ताह; भारतीयांमधील वाढते प्रमाण चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 3:29 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: भारतात ग्लॉकोमाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण ४० टक्के वाढले असून ...
ठळक मुद्दे१० ते १६ मार्च जागतिक ग्लॉकोमा सप्ताह