लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्र्याचा ज्यूस, संत्र्याची बर्फी यापलीकडे तिसरे व्यंजन कदाचित आपल्याला आठवत नसेल. पण संत्र्यापासून कित्येक व्यंजन बनू शकतात, हे वर्ल्ड ऑरेज फेस्टिव्हलनिमित्त आयोजित कुकिंग स्पर्धेत हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व श्री बाळासाहेब तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरिंंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी संत्र्याचे किमान ५० व्यंजन बनविले. या कुकिंग स्पर्धेमुळे दोन्ही कॉलेज संत्र्याच्या सुगंधानी दरवळत होते. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला होता. उपराजधानीत सुरूअसलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल विद्यार्थ्यांसाठीही उत्साह व उत्सुकतेचा विषय ठरतो आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी म्हणाले की, नागपूर संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते. संत्रा ही थीम ठेवून ही स्पर्धा होत असल्यामुळे, आमच्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखविण्याचे चॅलेंज होते. संत्र्यापासून काहीतरी नवीन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी संत्र्यापासून नारिंगी केक, आरेंज डिलाईट, ऑरेंज चॉकलेट, ऑरेंज चिकन टिक्का, ऑरेंज स्वॉफ्टी, ऑरेंज खीर, रसमलाई, शाही पुलाव, ऑरेंज जेली, नान चपाती (रोटी) असे जवळपास तीन वेगवेगळे व्यंजन विद्यार्थ्यांनी तयार केले होते. कॉलेजच्या हॉलमध्ये सर्व व्यंजन विद्यार्थ्यांनी आकर्षकपणे सजविले होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. एस. थोरात, विभागप्रमुख आरती मेश्राम, शेफ नितीन शेंडे, मृणाल रामटेके, माधवी शेंडे, अन्नु पिल्लई यांनी परीक्षक म्हणून पाहणी केली. श्री बाळासाहेब तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरींग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा रेसिपी कॉन्टेंस्टमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑरेंज अॅपल स्ट्रडल, ऑरेंज पाई, ऑरेंज पास्ता, ऑरेंज मोमोज, ऑरेंज पेन केक सह ३० प्रकारचे व्यंजन तयार केले होते. परीक्षक म्हणून कॉलेजचे प्रा. योगेश मेश्राम, डॉ. अनिल सोनटक्के, अंकित केनेकर, अंकुश त्रिपाठी यांनी पाहणी केली. कुकिंग वर्कशॉपसाठी यांची झाली निवडप्रत्येक कॉलेजमधून ५ विद्यार्थ्यांची २१ जानेवारी रोजी होणाऱ्या शेफ गौतम महर्षी यांच्या कुकिंग वर्कशॉपसाठी निवड करण्यात आली. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथून अक्षय हळबे, शुभम शाहू, क्लारेन्स धुर्वे, कृषभ मंडलिक, अफराज रंगवाला या विद्यार्थ्यांची निवड झाली. तर तिरपुडे कॉलेजमधून स्वप्निला चक्रवर्ती, हाशीम खान, फैजुल्लाह खान, विशेष बाहेश्वर, मेघा वांढरे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतून विद्यार्थ्यांची कल्पकता पुढे आलीवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल निमित्त आयोजित या पाककृती स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची कल्पकता पुढे आली, शिवाय संत्र्यापासून कित्येक नवनवीन प्रकारचे व्यंजन तयार होऊ शकतात, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. ही स्पर्धा हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणार आहे, असे मत कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी.एस. थोरात व प्राचार्य सतीश नायडू यांनी व्यक्त केले.