ठळक मुद्देकृषी प्रदर्शन : नवीन संशोधनासह विविध प्रजातींचे दर्शन
आॅनलाईन लोकमतनागपूर :संत्र्याच्या नवीन संशोधनासह विविध प्रजातींबाबत शेतकऱ्यांनी माहिती करून घेतली. संत्र्याच्या या विश्वात शेतकरी रममाण झाले होते. या प्रदर्शनात एकूण ५० स्टॉल लागले आहेत. यात महाराष्ट्र, पंजाब, मिझोरम, आसाम, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आदी देशातील विविध राज्यांसह श्रीलंका, भुतान, इस्रायल, टर्की आदी देशातील स्टॉलही लागले आहेत. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांना शेती पूरक उद्योग व कृषी पर्यटनावर मार्गदर्शन करण्यात आले. या महोत्सवात शेतकºयांना जगभरातील तंत्र एकाच ठिकाणी बघावयास मिळाले.फडणवीस-गडकरी यांनी केली पाहणीतत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खा. अजय संचेती, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपस्थित होते.जैन तंत्रज्ञानाचा ‘स्वीट आॅरेंज ’जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने प्रथमच ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट आॅरेंज’ या नावाने उपलब्ध केल्या आहेत. जैन स्वीट आॅरेंजच्या पाच जाती उपलब्ध आहेत. त्याला जैन आॅरेंज-१ , २, ३, ४ आणि ५ असे नाव देण्यात आले आहे. या नवीन जाती जास्त उत्पन्न देणाºया, लवकर व उशिरा काढणीस योग्य अशा आहेत. जमीन व पाण्याची सुपिकता व प्रत यानुसार या नवीन जातींपासून शेतकरी सरासरीपेक्षा दुप्पट उत्पादन घेऊ शकतात. ब्राझिल येथून २० विविध प्रकारच्या लिंबूवर्गीय जातींच्या झाडे आणून त्यावर जवळपास ७ वर्षे संशोधन केल्यानंतर ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे. ही सिडलेस आहे. या बिया कमी असतात. लागवडीनंतर चार वर्षात उत्पादन मिळते. या आॅरेंजच्या खुंटांची लागवड ही माती विरहीत कपात ग्रीनहाऊसमध्ये केली जाते. खुंटापासून रोगाच्या प्रसाराला आळा बसतो. टीप बडींग पद्धतीने डोळा भरला जातो. रोपांची संपूर्ण वाढ टेबलावर मोठ्या कपात ( रुट ट्रेनर) नियंत्रित वातावरणात केली जाते. रोपो २०५० मिलीच्या कपामध्ये दिली जातात. त्यामुळे चांगला रुट बॉल तयार होतो व मुळांना इजा होत नाही. रोप लागवड केल्यानंतर मर होण्यची शक्यता फारच कमी असते. ‘फायटोप्थोरा’ व मर रोगाला आळा बसतो. ज्यूसचे प्रमाण जास्त असते. जैन इरिगेशनचे हे ‘स्वीट आॅरेंज’ आॅरेंज वर्ल्ड फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे. जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ अनिल पाटील, दिलीप सोनवणे, नितीन झाडे, जी.जी. पवड आदी जैन आॅरेंज स्वीट बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. यासोबतच जैन इरिगेशनचे पाईप, टिश्यु कल्चर, सोलर पंप, कॉलम पाईप, स्प्रिकलर, रेनपोर्ट आदींची माहिती येथे उपलब्ध आहे.युपीएलने आणले ‘झेबा’ पिकाचे स्वत:चे जलाशयपेरणीपासून तर विक्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या युपीएल लि. कंपनीने आता झेबा हे पिकाचे स्वत:चे जलाशय असलेले शोषक घटक शेतकºयांसाठी आणले आहे. झेबा हे एक शोषक घटक असून ते आपल्या वजनाच्या ४०० पट पाणी धरून ठेवते. ते पाणी शोषते, साठवते शोषलेले पाणी पिकांच्या गरजेनुसार वेळोवेळी पुरवित राहते. जैविकदृष्ट्या विघटनशील व जमिनीतील जीवजंतूस सुरक्षित, जमिनीत सहजगत्या मिसळणारे रवाळ दाणेदार उत्पादन होय. ५ किलो प्रति एकर झेबा वापराने ७५ टक्के शिफारित सिंचनापेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते. झेबाच्या वापरामुळे पिकांच्या मुळांची मजबूत व जोमदार वाढ होते. पीक चटकन व सशक्त उभारी घेते. पीक पाण्याचा ताण सहन करू शकते. फुलगळ कमी करते. फळधारणेत सुधारणा होते. दाणे टपोरे व फळांचे आकार व वजन वाढते. ए दर्जाच्या शेतमालाच्या टक्केवारीत वाढ आणि अधिक उत्पादन, अधिक मिळकत होऊन शेतकऱ्यांचा फायदा होतो. आॅरेंज वर्ल्ड फेस्टिव्हलमध्ये युपीएलचे प्रताप रणखांब, समीर टंडन, ताराचंद गोंगले, प्रशांत वानी, विकास पाटी आणि अमोल अंधळे हे या झेबाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.पंजाब अॅग्रोने घालून दिला आदर्शनागपूर हे संत्र्यासाठी ओळखले जाते. परंतु येथील संत्रा उत्पादकांची स्थिती सर्वांनाच माहीत आहे. संत्र्यावर आधारित प्रकल्प विदर्भास उभारल्यास नवीन क्रांती घडेल असे बोलले जाते. त्यादिशेने सध्या प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात पंजाब अॅग्रोने आदर्श घालून दिला आहे. विदर्भातील संत्रा उत्पादकांसारखीच काहीशी स्थिती पंजाबमध्ये सुद्धा होती. तेथील संत्रा उत्पादकांन चांगला मार्केट उपलब्ध व्हाव, या उद्देशाने पंजाब सरकारने पाऊल उचलले.पंजाब अॅग्रो ज्युसेस लि. ही पंजाब सरकार अंतर्गत असलेली कंपनी थेट शेतकऱ्यांकडून संत्रा विकत घेऊन त्यापासून ज्युस तयार केले जाते. हे ज्यूस मार्केटमध्ये विकले जाते. यातून शेतकऱ्यांना लाभ झाला असून पंजाबलाही स्वत:चे एक ब्रॅण्ड मिळाले आहे. पंजाब अॅग्रो ज्युस लि.च्या स्टॉलवर अरुण कांत व देवेंद्र शर्मा हे शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत.मणिपूर आॅर्गनिक मिशन एजन्सीमणिपूरच्या कृषी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या मणिपूर आॅर्गनिक मिशन एजन्सीने प्रदर्शन लावले आहे. त्यात त्यांनी कचाई लेमन आणि तमेनग्लाँग आॅरेंज अशा दोन प्रकारच्या संत्र्याचे उत्पादन ठेवले आहे. जंभेरी पन्हेरीवर कचाई लेमनची कलम बांधली जाते. उरखुल जिल्ह्यातील कचाई येथे अशाप्रकारचे संशोधन करण्यात आल्याने ‘कचाई लेमन’ असे नाव या संत्र्याला पडले. एका संत्र्यापासून ३६ ते ५६ मिलि रस निघतो. या संत्र्याला लागणारा उत्पादन खर्च हा अत्यल्प आहे. त्यामुळे मणीपूरमधील शेतकरी याकडे वळत आहे. साधारणत: एक संत्रा ६० ते १०० ग्रॅम वजनाचा असतो. त्याच्या सालीची जाडी ही १.९ ते ३.५ मिमी अशी असते. यात केवळ ७ ते ९ बिया असतात. या फळाला आतापर्यंत जीओग्राफिकल इंडिकेटरसह विविध संस्थांनी पुरस्कृत केलेले आहे. तमेनग्लाँग प्रजातीच्या एका संत्र्यात ३७ मिग्रॅ कॅल्शियम, ०.१५ मिग्रॅ आयर्न, १२ मिग्रॅ मॅग्नेशियमसह सी जीवनसत्व २६.७ मिग्रॅ, जीवनसत्व अ, ई आदी असतात. वजन ९० ते ११० गॅ्रम असून वजनाच्या ४० ते ५० टक्के रस त्यातून निघतो. आॅक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यात या प्रजातीची संत्री उपलब्ध होतात.भूतान कृषी मंत्रालयाच्या स्टॉलने वेधले लक्षया प्रदर्शनात भूतानच्या कृषी मंत्रालयाचा स्टॉल लागलेला आहे. लोकल मंडरीन, फोर्चुन, ओकुत्सवामे, अरेप-१, वेंगर-त्शालू-१, ओत्थू, वेंगर-त्शालू-२, वेंगर ड्रकू या लिंबूवर्गीय फळांचे संशोधन त्यांनी केलेले असून त्याबाबतची माहिती देण्यासाठी सोनम गेलसे यांनी दिली. नागपुरी संत्रा, पंजाबचा संत्रा यापेक्षा आमच्याकडील संत्रा थोडा वेगळा आहे. आॅक्टोबर ते जानेवारी या महिन्यात सर्व प्रकारच्या प्रजातींची संत्री उपलब्ध होतात. त्यापैकी लोकल मंडरीन हा संत्रा साधारणत: जानेवारीत उपलब्ध होतो. आमच्याकडे वेंगर-त्शालू या संत्र्याला अधिक मागणी आहे. संत्र्याबाबत भूतान कृषी मंत्रालयातर्फे अधिकाधिक संशोधन केले जात आहे. लवकरच यामध्ये आणखी काही प्रजातींची भर पडणार आहे. आतापर्यंत आमच्या देशातील संत्रा बहुतांश देशात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आमच्या संत्र्याची परदेशवारी झाली. ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ने भारतातही आमचा संत्रा पोहोचेल, असा विश्वास आहे.केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थासंत्र्याची लागवड, निगा, नियोजन, व्यवस्थापन आदीबाबतची तंत्रशुद्ध माहिती भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या स्टॉलवरून शेतक ऱ्यांना मिळाली. या संस्थेने एन.आर.सी.सी. नागपूर मेंडरिन सीडलेस-४, एन.आर.सी.सी. नागपूर लिंबू-७ आणि लिंबू-८ आदी संशोनधान केलेल्या प्रजाती येथे ठेवलेल्या आहेत. पीव्हीसी नळीचा वापर करून पाण्याचे नियोजन, ठिबक सिंचनचा फायदा याबाबत त्यांनी तंत्रशुद्ध माहिती उपलब्ध करून दिली. जानेवारी, फेब्रुवारी ते उन्हाळ्यात एप्रिल, मे, जून, हिवाळ्यात संत्र्याच्या झाडाला किती पाणी दिले जावे, खताची मात्रा, तण नियंत्रण, विविध रोगांना नियंत्रण करण्यासाठी औषधाचा सल्ला, संत्र्याची तोडणी, पॅकिंग ही माहिती संस्थेतर्फे देण्यात येत आहे. प्रधान वैज्ञानिक (मृदा विज्ञान) डॉ. ए. के. श्रीवास्तव, एन. विजयाकुमारी, डॉ. ए. डी. हुच्चे, डॉ. आय. पी. सिंह, डॉ. आर. के. सोनकर, डॉ. आर. ए. मराठे, डॉ. ए. के. दास, डॉ. विनोद अनाव्रत, डॉ. दिनेश कुमार, डॉ. सी. एन. राव, डॉ. पी. एस. शिरगुरे, डॉ. ए. ए. मुरकुटे, डॉ. अंजिता जॉर्ज, डॉ. किरण भगत, प्रसांथ तेज आदी तज्ज्ञांचे संशोधन सुरु आहे
फलोत्पादन विभाग, मिझोरम शासन‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये कृषी प्रदर्शन लावण्यात आले असून देश-विदेशातील स्टॉल्स लागलेले आहेत. मिझोरम शासनानेही येथे स्टॉल लावला आहे. त्यात खासी मंडरीन, पमेलो या दोन संत्र्याच्या तेथील प्रजातीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्यंत कमी बिया असलेल्या खासी मंडरीन हा चविष्ट असा संत्रा आहे. नागपुरी संत्र्याच्या आकारातील या फळावर मिझोरममध्ये संशोधन करण्यात आले असून सध्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत. पमेलो ही त्यापैकीच एक प्रजात आहे. आपल्याकडील मोसंबीसारखे दिसणारे हे फळ आकाराने मोठे आहे. त्यामध्ये रसाचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय टंगारिन, वॅटेनिकोसुद्धा तेथे ठेवलेली आहेत. सिमला मिरचीपेक्षा थोड्या मोठ्या आकारातीलही संत्रा मिझोरममध्ये विकसित केले आहे.