शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जागतिक ओझोन दिवस; उपराजधानीत वाढतोय ‘बॅड ओझोन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:44 AM

उपराजधानीत जमीन पातळीवरील ‘ओझोन’मध्ये वाढ होत आहे. या वर्षातील दोन महिन्यांत तर निर्धारित पातळीहून जास्त प्रमाण दिसून आले व सर्वाधिक आकडेवारीचीदेखील नोंद झाली.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये सर्वाधिक आकडेवारीची नोंद जमीन पातळीवरील ‘ओझोन’ ठरू शकतो धोकादायक

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पृथ्वीहून ठराविक उंचीवर असलेला ‘ओझोन’ एकीकडे आपल्यासाठी फायदेशीर असला, तरी जमिनीच्या पातळीवरील ‘ओझोन’ वायू तितकाच धोकादायक ठरत आहे. उपराजधानीत जमीन पातळीवरील ‘ओझोन’मध्ये वाढ होत आहे. या वर्षातील दोन महिन्यांत तर निर्धारित पातळीहून जास्त प्रमाण दिसून आले व सर्वाधिक आकडेवारीचीदेखील नोंद झाली. या ‘बॅड ओझोन’संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील चिंता व्यक्त केली आहे.उंचीवर असलेल्या वातावरणातील ‘ओझोन’चा पट्टा हा साधारणत: जमिनीपासून २५ ते ५० किलोमीटर अंतरावर असतो. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून हा रक्षण करतो. मात्र जमिनी पातळीवरदेखील ‘ओझोन’ असतो व याचे प्रमाण वाढले तर विविध वायुघटकांसमवेत संयोग होऊन तो पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतो. जमिनीच्या पातळीवर साधारणत: १ क्युबिक मीटर हवेत १०० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी ‘ओझोन’ असेल तर तो धोकादायक ठरत नाही. मात्र याहून जास्त प्रमाण निश्चितच विविध संकटांना आमंत्रण देणारे असते. विविध वैज्ञानिक संस्थांकडून ही पातळी निर्धारित करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘सीएएक्यूएमएस’च्या (कन्ट्युनियस अ‍ॅम्बिअन्ट एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग स्टेशन्स) माध्यमातून या ‘ओझोन’ची आकडेवारी नियमितपणे गोळा करण्यात येते. २०१७-१८ पर्यंत ‘ओझोन’ची आकडेवारी ही नियंत्रणातच होती. परंतु २०१८-१९ मध्ये प्राप्त झालेली आकडेवारी ही चिंता वाढविणारी आहे. २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात शहरात ‘ओझोन’ची पातळी १३८.५ मायक्रोग्र्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी होती, तर मार्चमध्ये ११९.३ मायक्रोग्र्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी नोंद झाली. फेब्रुवारीमधील पातळी ही निर्धारित पातळीहून ३८.५ टक्के तर मार्चमधील पातळी सुमारे २० टक्के अधिक होती.जमीन पातळीवरील ओझोनमुळे होणारे धोकेश्वसनास अडथळेश्वसनाच्या आजारात वाढखोकला आणि घशाचे विकारअस्थमा, एम्फिसिमा तसेच ब्रॉन्कायटीसची शक्यतापिकांवर प्रतिकूल परिणामअचानक झाडे सुकणे किंवा वाढ खुंटणेज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी जास्त धोकादायकवाहने, ऊर्जा प्रकल्पांमुळे वाढतेय पातळीजमीन पातळीवर सापडणाºया ओझोनची गणना सेकंडरी पॉल्युटन्टमध्ये होते. वाहने तसेच ऊर्जा प्रकल्पांमधून नायट्रोजन ऑक्साईड व नायट्रोजन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो. या वायूंची सूर्यप्रकाश किंवा गरम वातावरणात व्होलाटाईल ऑरगॅनिक कपांऊंड सोबत प्रक्रिया झाल्यावर जमिनीजवळील वातावरणात ओझोनची निर्मिती होते.

टॅग्स :environmentपर्यावरण