लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रक्त हवे असल्यास रक्तदाता आणा, असा अजब निर्णय कॉही रक्तपेढ्यांनी घेतला आहे. यामुळे दर १५ दिवसानी लागणाऱ्या रक्तासाठी कुठून रक्तदाता आणावा, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्य पालकांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन, त्यात रक्तपेढ्यांच्या या अडवणुकीमुळे थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत आले आहे.थॅलेसेमियाच्या रुग्णांना आयुष्यभर रक्त घ्यावे लागते. साधारण १५ ते ३० दिवसाच्या अंतराने रक्त चढवावे लागते. सिकलसेल व थॅलेसेमिया सेंटरचे संचालक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले.‘लॉकडाऊन’ मुळे सध्या रक्तदान शिबिरे बंद आहेत. थॅलेसेमियापीडितांना ताजे रक्त मिळेनासे झाले आहे. जिथे रक्त उपलब्ध होत आहे तिथे सात दिवस आधीचे रक्त घेण्याची वेळ आली आहे. हे त्यांच्या शरीरासाठी हानिकारक आहे. सरकारी आदेशानुसार थॅलेसेमियाच्या रुग्णांना नि:शुल्क व रक्तदाता न देता रक्त देणे रक्तपेढींसाठी बंधनकारक आहे. परंतु आता रक्तपेढीच रुग्णांकडे रक्तदाता उपलब्ध करण्यास सांगत आहे. दर १५ दिवसात रक्तदाता मिळवणे रुग्ण व त्यांच्या पालकांसाठी कठिण होत आहे. विशेष म्हणजे, अनेक रुग्ण मेयो, मेडिकलमधून रक्त घेत असतात. परंतु येथे कोरोनाबाधित रुग्ण ठेवले जात असल्याने या रुग्णालयात जाण्यास अनेकांना भीती वाटत आहे. या शिवाय, गावखेड्यातून शहरात रक्तासाठी येणाºया रुग्णांना पोलिसांच्या अटकावालाही सामोरा जावे लागत आहे. वेळेवर रक्त मिळणे कठीण झाल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. या रुग्णांना नियमित रक्त मिळण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. देशातील जवळजवळ दीड लाख थॅलेसेमियापीडित या समस्येला तोंड देत असल्याचेही डॉ. रुघवानी म्हणाले.
जागतिक थॅलेसेमिया दिन : रक्त हवे, रक्तदाता आणा,थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 10:32 PM
रक्त हवे असल्यास रक्तदाता आणा, असा अजब निर्णय कॉही रक्तपेढ्यांनी घेतला आहे. यामुळे दर १५ दिवसानी लागणाऱ्या रक्तासाठी कुठून रक्तदाता आणावा, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्य पालकांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन, त्यात रक्तपेढ्यांच्या या अडवणुकीमुळे थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत आले आहे.
ठळक मुद्देरक्तपेढ्यांची अडवणूक