लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाच्यावतीने घेण्यात येणारा राज्यस्तरीय गौरव सोहळा यंदा नागपुरात होत आहे. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होणाऱ्या या सोहळ्यात आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी, नामवंत व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. तत्पूर्वी त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावाही घेतला.यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, प्रधान सचिव मनिषा वर्मा, आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, अपर आयुक्त डॉ. संदीप राठोड, उपस्थित होते. डॉ. उईके यांनी सांगितले, या कार्यक्रमामध्ये २९ आदिवासी सेवक पुरस्कार व ९ आदिवासी सेवा संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच मिशन शौर्य-२ अंतर्गत माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची कामगिरी करणाºया ११ विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह गौरव करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय, अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा, तसेच इतर शाळेतील मार्च-२०१९ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या १५४ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया राज्यातील ५६ अनुसूचित जमातीतील मान्यवरांना ‘महाराष्ट्र आदिवासी रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. हस्तकला व चित्रकला या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया १७ अनुसूचित जमातीतील मान्यवरांना ‘आदिवासी कलाकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. आश्रमशाळा कायापालट अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या एकूण १९ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.सामूहिक, वैयक्तिक वनहक्क यामध्ये उत्कृष्ट काम करणाºया व्यक्ती तसेच पेसा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती यांना गौरविण्यात येणार आहे.वेबसाईट-पोर्टलचे उद्घाटनया कार्यक्रमात डीजी हेल्थ प्रणाली. वन धन योजना, नागपूर एटीसी वेबसाईट, सेंट्रल असिस्टन्स सिस्टीम, अनुदानित आश्रम स्कूल पोर्टलचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी विविध सामंजस्य करारसुद्धा करण्यात येणार असून विविध योजनांची घोषणा सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.
जागतिक आदिवासी दिनाचा राज्यस्तरीय गौरव सोहळा नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:25 AM
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाच्यावतीने घेण्यात येणारा राज्यस्तरीय गौरव सोहळा यंदा नागपुरात होत आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देआदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती : गुणवंत विद्यार्थी, नामवंत व्यक्ती व संस्थांचा होणार गौरव