- जागतिक महिला दिनानिमित्त मानकापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैजंती मंडवधरे यांच्यासह सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन केंद्रीय पोलीस शांतता कमिटीचे सदस्य संजय भिलकर, पापा शिवपेठ, नागेश राऊत, कृष्णा गावंडे, संजय मांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी,पी.एम.शेंडे, ज्योती घोरसे, मीना मस्के, अनिता गाडबैल, वैशाली मोहोड, पौर्णिमा उपरीकर, ज्योती गेडाम, सुकेषनी घोरले, कलावती भुजाडे, सोनाली कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
ए. आर. फुले ज्यु. कॉलेज ()
- ए. आर. फुले ज्यु. कॉलेज शांतीनगर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री रमेश फुले, अध्यक्ष्या अर्चना फुले, उपाध्यक्ष तुषार फुले, मोहित फुले, प्राचार्य मंगेश खोब्रागडे उपस्थित होते. महिला सशक्तीकरणात महिला शिक्षिका राहिला खान, अर्चना चिखले, सिंधू गजभिये, विभा पारधी, प्रिया बोरकर, लक्ष्मी तिवारी, सोनाली मेश्राम, क्षितिज गोंडाणे, टेंभुर्ण, शेख, कळंबे, नेहा डोलाई, शुभांगी पराते व दिनेश मुर्या, सुमित रहाटे आदी शिक्षक उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्ष अर्चना फुले यांनी स्त्री जीवनाविषयी विचार प्रकट करून प्रेरणा दिली.