उमरेड : योग मित्र मंडळ, सच्चिदानंद शाखा, ग्रीन गार्डन शाखा, स्व. देवरावजी इटनकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती क्रीडा मंडळ आणि गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस साजरा झाला. स्थानिक सच्चिदानंद सभागृहात आयोजित या शिबिरात ८० योग साधकांनी सहभाग घेतला. नगरसेविका योगीता इटनकर, अरुणा हजारे यांची उपस्थिती होती. विविध आसने, प्राणायाम प्रात्यक्षिकाचे मौलिक मार्गदर्शन उमा खंते, अलका रेवतकर यांनी केले. वत्सला इन्स्टिट्यूटच्यावतीने योग दिवस साजरा केला. यावेळी डॉ. संगीता साठवणे यांनी मार्गदर्शन केले. जेसीआय उमरेड आणि योग मित्र मंडळच्या संयुक्तवतीने सामूहिक योगाभ्यास आणि प्राणायाम करण्यात आला. राजकुमार पांडे, निकिता ब्रह्मे, संध्या गोतमारे, जया ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी जेसीआयचे संस्थापक डॉ. शशिकांत जयस्वाल, अतुल खांडेकर, प्रमोद चौधरी, संजय ठाकरे, प्रमोद रघुते, प्रवीण गिरडे, आशिष वाढई, प्रेम गावंडे, बेनिगोपाल बजाज, निशांत डोये, उमेश भिवापूरकर, सचिन जिकार, गजानन पडोळे, कल्याणी खांडेकर, विधी पंडित, ओजस खांडेकर आदींची उपस्थिती होती.
उमरेड येथे जागतिक योग दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:07 AM