काटाेल : जागतिक युवा काैशल्य दिनानिमित्त पारडसिंगा (ता. काटाेल) येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गुरुवारी (दि.१५) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध काैशल्यांचा विकास करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.जी. घाटोळे तर प्रमुख अतिथी म्हणून एस.पी. ढोके उपस्थित हाेते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध सुप्त व कलागुण, तसेच काैशल्याचा विकास करणे, ते वृद्धिंगत हाेऊन त्यांचा देशाला फायदा व्हावा, हा शिक्षणाच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश असल्याचेही, तसेच त्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या कला, काैशल्याचे प्रदर्शन केले. त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास व्हावा, म्हणून त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले, तसेच त्यांना व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. संचालन व्ही.जी. पाठक यांनी केले, तर ए.एम. राऊत यांनी आभार मानले.