आॅनलाईन लोकमतनागपूर :१६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसात संत्र् याच्या गोडव्याने व नारंगी रंगाने न्हाऊन निघालेल्या नागपुरातील ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चा सोमवारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विज
संत्र्याचे ‘ब्रॅन्डिंग’ जगभरात होणारयावेळी विजय दर्डा यांनी आपल्या भावना मांडल्या. ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मुळे नागपुरात एक नवी सुरुवात झाली आहे. यामुळे संत्र्याला जागतिक ओळख मिळणार आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून संत्र्याचे जगभरात ‘ब्रॅन्डिंग’ होण्यास मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हाऊसफुल्ल गर्दी‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या समारोपप्रसंगी विभागीय क्रीडा संकुल ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. कार्यक्रम सुरू होण्याअगोदरच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कलाकारांच्या सादरीकरणाला नागपूरकरांनी भरभरून साद दिली. संपूर्ण परिसरात प्रचंड सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळी मैदानात हजारो लोक एकत्र झाले होते.‘मोबाईल फ्लॅश’ने चकाकले सभागृहसमारोपप्रसंगी कलाकारांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागपूरकरांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. सर्वांच्या हाती स्मार्ट फोन असल्याने प्रत्येक जण या कलावंतांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात होता. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर कॅमेऱ्यांचे फ्लॅश चकाकायला लागले. इतक्या गर्दीतही स्टेजवरील कलावंतासोबत दुरून का होईना आपण कसे दिसू यासाठी तरुणाईचे सेल्फी काढणे सुरू होते. सभागृहात बराच वेळ तरुणाईचे फ्लॅश चकाकत राहिले. हे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकारांचे विरुद्ध दिशेने कॅमेऱ्याचे ‘फ्लॅश’देखील चकाकले.