आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपुरी संत्रा म्हणजे जगप्रसिद्ध गोष्ट. या शहराचे उपनाव पडले तेच मुळात आॅरेंज सिटी. परंतु मागच्या काही वर्षात ही ओळख जरा पुसट होत चालली होती. हे चित्र बदलून संत्रा उत्पादनाच्या बळावर वैदर्भीय कृषी व्यवस्थेला नवे बळ देण्यासाठी नागपुरी संत्र्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी १६, १७ व १८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादक सहभागी होतील.या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदान-प्रदान होऊन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग तयार होईल. यूपीएल समूह हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहकार्याने तो आयोजित केला आहे. हे लोकमतचे इनिशिएटिव्ह आहे. १६ डिसेंबर रोजी येथील सुरेश भट सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन होईल.या महोत्सवात संगीत, कला, नृत्याची मेजवानी असेल. पण याहून महत्त्वाचे म्हणजे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा लागवडीपासून ते संत्रा वाहतुकीपर्यंतच्या ‘आॅरेंज व्हॅल्यू चेन’ची माहिती विविध चर्चासत्र आयोजित करून दिली जाईल.यासाठी आॅरेंज ग्रोवर असोसिएशन आॅफ इंडिया, आयसीएआर- सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे सहकार्य लाभत आहे. हा नागपूर शहराचा उत्सव आहे. त्यामुळे शहरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यवसायी सर्वांनी एकत्र येऊन हा महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. विदर्भात पर्यटक जसे वाघ बघायला येतात तसे यापुढे त्यांनी संत्र्याची चव चाखायला यावे, हा या महोत्सवाचा उद्देश आहे. या महोत्सवादरम्यान संत्रांच्या बागांमध्ये सहल आयोजित केली जाणार आहे. विदर्भ, महाराष्ट्रासह पंजाब, आंध्र प्रदेश, मणिपूर आदी राज्यांसह इस्रायल, टर्कीमधूनही संत्रा उत्पादक शेतकरी आणि तज्ज्ञ या महोत्सवात सहभागी होतील.संत्र्याचे उत्पादन कसे वाढवावे, गुणवत्ता कशी राखावी यावर ते आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. संत्रा उत्पादनात भारताचा जगात चवथा क्रमांक लागतो. तर देशात संत्रा उत्पादनात नागपूरचे अव्वल आहे. तरीही योग्य निर्यात धोरणाअभावी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकलेला नाही. यापुढे तो मिळावा यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने नव्याने प्रयत्न केले जाणार आहेत.
नागपूरकरांनो, कल्पना सुचवाहा महोत्सव या शहराची ओळख व्हावी, असा आयोजकांचा प्रयत्न आहे. या महोत्सवाला अविस्मरणीय करण्याकरिता नागरिकांच्या कल्पकतेचा यात समावेश केला जाणार आहे. हा महोत्सव कसा असावा, यात काय नवीन व कल्पक करता येईल याबाबत नागपूरकरांना आपल्या कल्पना सुचवायच्या आहेत. या कल्पनांना महोेत्सवाच्या आयोजनात स्थान दिले जाईल. आपल्या कल्पना तुम्ही या संंकेतस्थळावर सूचवू शकता.रिटेलर्ससाठी स्पर्धा४या महोत्सवादरम्यान रिटेलर्ससाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांंवर, दुकानांमध्ये संत्रा या थिमवर आधारित सजावट त्यांना करायची आहे. यात कल्पकतेला प्रचंड वाव आहे. कोणाची सजावट सर्वात सुंदर आहे याचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रिटेलरला ५१ हजारांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.