शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जगभरातील मराठी प्रेरणादूतांची मांदियाळी नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 1:09 AM

जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ या शीर्षकाखालील १६ वे जागतिक मराठी संमेलन शुक्रवारपासून सुरू होत आहे. ४, ५ व ६ जानेवारी असे तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. देशातच नव्हे तर जगभरात स्वत:च्या कर्तृत्वाने मराठीचा झेंडा रोवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे एकत्रित मार्गदर्शन व्हावे व तरुणांना प्रेरणादायी ठरावे या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने जगभरातील प्रेरणादूतांची मांदियाळी नागपूरला भरणार आहे.

ठळक मुद्देजागतिक मराठी संमेलन आजपासून : मराठी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ या शीर्षकाखालील १६ वे जागतिक मराठी संमेलन शुक्रवारपासून सुरू होत आहे. ४, ५ व ६ जानेवारी असे तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. देशातच नव्हे तर जगभरात स्वत:च्या कर्तृत्वाने मराठीचा झेंडा रोवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे एकत्रित मार्गदर्शन व्हावे व तरुणांना प्रेरणादायी ठरावे या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने जगभरातील प्रेरणादूतांची मांदियाळी नागपूरला भरणार आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. व्हीआयपी रोडवरील वनामतीच्या सभागृहात हे संमेलन होऊ घातले असून अमेरिकेचे उद्योजक श्रीनिवास ठाणेदार हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. पहिल्या दिवशी उद््घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. संमेलनाचे संयोजक गिरीश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीनंतर संमेलनाध्यक्ष डॉ. ठाणेदार हे मनोगत व्यक्त करतील. दुपारी ४ वाजता ‘साता समुद्रापलिकडे’ या विशेष कार्यक्रमात विविध देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे मान्यवर आपले मनोगत मांडतील. सायंकाळी ७.३० वाजता रामदास भटकळ यांचे लेखन, वृषाली देशपांडे यांचे दिग्दर्शन आसिना पंडित यांची निर्मिती असलेले ‘जगदंबा’ या नाटकाचे सादरीकरण होईल.५ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता दुसºया सत्रात ‘साता समुद्रापलिकडे - भाग २’ या सदरात जगभरातील मराठी मान्यवरांचे मनोगत ऐकता येईल. दुपारी २ वाजताच्या ‘शून्यातून शिखराकडे’ या सदरात विविध क्षेत्रात कार्यरत विलास काळे, अतुल पांडे, नरेंद्र हेटे, विवेक देशपांडे, मनीष नुवाल, अनिल सोमलवार, शशिकांत चौधरी, प्रकाश वाघमारे, अनिल नायर यांच्या मुलाखती होतील. दुपारी ४.३० वाजता प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री कल्पना सरोज यांची मुलाखत होईल. सायंकाळी ५.२५ वाजता ‘भारत विरुद्ध इंडिया’ या विषयावर परिसंवाद होईल.सायंकाळी ६.३० वाजता हनमंत गायकवाड यांची मुलाखत होईल तर सायंकाळी ७.३० वाजता चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे व किशोर कदम यांच्या उपस्थितीत ‘चित्र, शिल्प व काव्य’ हा अनोखा कार्यक्रम सादर होईल. ६ जानेवारी रोजी ‘मराठी : काल, आज आणि उद्या’ या विषयावर मुलाखत कार्यक्रम होईल. सकाळी ११.३० वाजता ‘तेथे कर माझे जुळती’ या सदरात सेवाकार्यात आयुष्य वाहिलेल्या शफीक व सरहा शेख, प्रमोद चांदूरकर, रोमी भिंदर व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुबारक सय्यद यांच्या मुलाखती होतील. दुपारी २.३० वाजता ‘सरहद ओलांडताना’ या सदरात संजय निहार व गजानन नारे यांची मुलाखत होईल. सायंकाळी ५ वाजता या तीन दिवसीय संमेलनाचा समारोप पार पडेल. यावेळी पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील व अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

 

टॅग्स :marathiमराठीnagpurनागपूर