लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:नागपूर : विदर्भात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी ३१२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ६६,४४९ झाली आहे. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १८४०वर पोहचली आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.नागपूर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. तब्बल १९६६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ३६३९८ झाली आहे. शिवाय ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १२१६ वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सलग चवथ्या दिवशी रुग्णसंख्या २००वर गेली. २७९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णसंख्या ३४४६ झाली असून दोन रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या ४१ झाली आहे.वर्धा जिल्ह्यात १६८रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दोन रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १४६२ तर मृत्यूची संख्या ३१ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच सात रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या १४० झाली आहे. ८८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णांची संख्या ६४०९ वर पोहचली आहे. गोंदिया जिल्ह्यात १५० रुग्ण पॉझिटिव्ह तर एका रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या २०२७ तर मृतांची संख्या २७ वर गेली आहे.अकोला जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्येत घट दिसून आली असताना आता पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. आज ११८ रुग्णांची नोंद झाली असून तीन रुग्णांचे मृत्यू झाले आहे. रुग्णाची एकूण संख्या ४३६८ तर मृतांची संख्या १६३ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात ११२ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या २०५० झाली आहे.भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज १३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या १७४६ तर मृतांची संख्या ३० झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात ९१ रुग्ण पॉझिटिव्ह तर चार रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ३६०५ तर मृतांची संख्या ५३ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णांची संख्या १२२९ वर गेली आहे.