लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील आजूबाजूला असलेल्या दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १६ लाखांचे मोबाईल लंपास केले. बुधवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.सुगतनगर रिंगरोडवर सुधीर हरिराम गुप्ता यांची शिवम मोबाईल शॉपी आहे. मंगळवारी रात्री १०.३० ला ती बंद करून गुप्ता घरी गेले. बुधवारी सकाळी त्यांची आई मोबाईल शॉपीजवळ गेली तेव्हा त्यांना तेथे चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी मोबाईल शॉपीचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि आतमधील १२० मोबाईल, लॅपटॉप तसेच सुधीर यांच्या भावाच्या बाजूलाच असलेल्या दुकानातूनही विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण १५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. बघ्यांची मोठी गर्दी गुप्ता बंधूंच्या दुकानांसमोर जमली. माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या वेळी अंधार करून ठेवल्याने सीसीटीव्हीत चोरट्यांची छायाचित्रे स्पष्ट आली नाहीत. परंतु चोरटे तीन असावेत, असा अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी ठसेतज्ज्ञांचे पथक घटनास्थळी बोलवून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.आधीच केली तयारीचोरट्यांनी दुकान फोडून चोरी करण्याची तयारी आधीच करून ठेवली असावी आणि त्यांना या मोबाईल शॉपीची तसेच परिसराची माहिती असावी, असा अंदाज आहे. चोरटे क्रेटा या आलीशान कारने आले होते. जेव्हा ते दुकानाबाहेर निघाले नेमक्या वेळी बाजुला राहणारा एक व्यक्ती तेथे आला. त्याला संशय आल्यामुळे त्याने चोरट्यांना टोकले असता आरोपी त्यांच्या कारमधून सुसाट वेगाने पळून गेले. संबंधित व्यक्तीने त्याच्या अॅक्टीव्हाने कारचा पाठलाग करून चोरट्याच्या वाहनाचा क्रमांक टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. दरम्यान, रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारचा नंबर आणि मार्ग शोधून चोरट्यांना पकडण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.
नागपुरात मोबाईल शॉपी फोडून १६ लाखांचे मोबाईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 9:59 PM
जरीपटक्यातील आजूबाजूला असलेल्या दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १६ लाखांचे मोबाईल लंपास केले. बुधवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
ठळक मुद्देधाडसी चोरीने व्यापाऱ्यात खळबळ : जरीपटक्यात गुन्हा दाखल