शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

संमेलनाध्यक्ष होणे आवडेल पण...!

By admin | Published: September 02, 2015 4:31 AM

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही

नागपूर : साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही नाही. हा आरोप निराधार आहे. साहित्य संमेलन आयोजित क रणारे लोक ते करीत असतात, त्यांनी ते करीत राहावे. शौचालय नसेल तेथे लोक उघड्यावरच विधी आटोपणार ना. पण तरीही मला संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्याची अटच टाकली आणि विनंती, आग्रह झालाच तर मला संमेलनाध्यक्ष व्हायला आवडेल. पण ते संमेलन अखेरचे असले पाहिजे. अखेरच्या संमेलनाचे अध्यक्ष व्हायला मला आवडेल, असे मत ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. एका चर्चासत्रासाठी नागपुरात आले असताना ते बोलत होते. साहित्य क्षेत्रातला दहशतवादी असल्याचा आरोप माझ्यावर कुणी करीत असेल तर असे म्हणणारे लोक किती भित्रे आहेत, ते समजून घेण्याची गरज आहे. मी साधा, सरळ माणूस आहे. पण दहशतवादी म्हणून त्यांनी माझे महत्त्वच वाढविले आहे. महाराष्ट्र भूषणचा विरोध तात्त्विक ४बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्र भूषण देण्यास आपण विरोध केला. तो व्यक्तीविरोध नव्हता. हा विरोध वैचारिक होता. बाबासाहेबांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रातून ते मुस्लीम विरोधी असल्याचे चित्र निर्माण होते. प्रत्यक्षात महाराजांच्या विश्वासातले आणि मोठ्या पदांवरचे सेनापती, मित्र मुस्लीमच होते. या पुरस्काराने चुकीचा संदेश समाजात जाऊ नये म्हणून विरोध केला. इतिहास चुकीचा सांगितला गेला तर देश धार्मिक आधारावर पुन्हा विभाजनाच्या वाटेवर जाईल. ही काळजी आपण का घेऊ नये? असा प्रश्न त्यांनी केला. दाभोलकर, पानसरे आणि आता कर्नाटकातील मलेशप्पा एम. कलबुर्गी यांची हत्या यामागे काही षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सरकारची दिवाळखोरीच आहे. हे तालिबान आहे की पाकिस्तान. मी स्पष्ट बोलतो म्हणून मलाही ठार कराल का? तत्कालीन गांधी, फुले, आंबेडकरांचे विचारही लोकांना पटले नव्हते पण त्यांच्याच विचारातून क्रांती झाली, हे नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्याशिवाय त्यांचे वेतनच द्यायला नको, असे नेमाडे म्हणाले.