जयपूर : लोकमत समाचारचे राजस्थान ब्युरो चीफ राहिलेले स्व. धीरेंद्र जैन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित व्हर्च्युअल शोकसभेत वक्त्यांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. पत्रकारितेतील उच्च मापदंडासाठी त्यांना कायम ओळखले जाईल. त्यांची लेखणी सामाजिक जबाबदारीचे वहन करण्यास समर्पित होती, अशी भावना ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी व्यक्त केली.
लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी आपली भावना व्यक्त करताना स्व. धीरेंद्र जैन यांच्या निच्छलतेवर प्रकाश टाकला. त्यांच्या अशा छलरहित स्वभावामुळे त्यांचे प्रत्येकच जण प्रशंसक होते. बाबूजी श्री जवाहरलाल दर्डा यांच्या नावे राजस्थानच्या पत्रकारांना पुरस्कृत करण्यासाठी आणि अशोक गहलोत मित्रता पुरस्कार स्थापित करण्याच्या कार्यात त्यांचे योगदान कायम स्मरणीय आहे. धीरेंद्र जैन यांच्या नावे अवॉर्ड सुरू करण्यात यावे, असेही ते म्हणाले. धीरेंद्र जैन यांची मुलगी पत्रकार अनुभा यांनी लवकरच पुरस्कारासोबतच त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेची सुरुवात केली जाईल, असे सांगितले. अनुभा यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पाठविलेले पत्र वाचून दाखविले. गहलोत यांनी धीरेंद्र जैन यांचे असे जाणे म्हणजे पत्रकारिता जगतातली कधीही भरून न निघणारी पोकळी असल्याची भावना पत्रात व्यक्त केली.
...........