नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. मात्र शाळांमध्ये मुलांना प्रॅक्टिकल परीक्षेसाठी बोलविण्यात येत आहे. शाळेंच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे. लोकमतसोबत बोलताना पालकांनी सांगितले की परीक्षाच रद्द झाल्याहेत तर प्रॅक्टिकल परीक्षेसाठी मुलांना बोलविण्यात अर्थ काय? यासंदर्भात काही पालकांचा आरोप आहे की, शाळेचा हा फी वसुलीचा फंडा आहे. त्यांचा आरोप आहे की शाळा मुलांकडून फी वसुली करण्यासाठी या परीक्षांचे आयोजन करीत आहे. सोबतच मुलांच्या आरोग्याशी सुद्धा खेळ करीत आहे.
पालकांकडून ओरड होत असली तरी, कुठलाही पालक त्याविरोधात समोर येत नाही. पालकांकडून होत असलेल्या आरोपाबद्दल सीबीएससी शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क केला असता, प्राचार्यांनी सांगितले की, शाळेमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहे. सीबीएसईच्या निर्देशानुसार परीक्षा सुरू आहे.
- प्राचार्य काय म्हणतात
- मॉर्डन स्कूलच्या व्यवस्थापक नीरू कपई म्हणाल्या की सीबीएसईने यासंदर्भात निर्देश दिले आहे. या निर्देशानुसार ११ जूनपर्यंत पॅक्टिकलची परीक्षा घ्यायची आहे. त्यानुसार परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेच्या आयोजनादरम्यान मुलांच्या आरोग्याची खबरदारी घेतली जात आहे.
- सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड शाखेच्या प्राचार्य शिल्पी गांगुली म्हणाल्या की स्कूल सीबीएसईच्या निर्देशाचे पालन करीत आहे. पालकांसारखीच आम्हालाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहे. आम्ही कोरोनाच्या नियमांचे पालन करून परीक्षा घेत आहोत.
- सेंट पॉल स्कूल हुडकेश्वरचे निदेशक डॉ. राजाभाऊ टांकसाळे म्हणाले की मुलांच्या आरोग्याची काळजी घेत प्रॅक्टिकलच्या परीक्षांचे आयोजन केले आहे. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना बोलविले जात आहे.
- अंतर्गत मूल्यमापनासाठी होत आहे परीक्षा
यासंदर्भात केंद्रीय मंडळाच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की अंतर्गत मूल्यमापनासाठी पॅक्टिकलची परीक्षा होत आहे. विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करायचे आहे. मुलं व शिक्षकांचे आरोग्य लक्षात घेता शाळांना स्पष्ट सूचना दिल्या आहे. सीबीएससी परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज म्हणाले की आमच्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.