शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उत्तर प्रदेशचा अध्यक्ष नेमणे चुकीचे; शशी थरूर यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2022 8:42 PM

Nagpur News निवडणूक प्रक्रियेदरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदीक्षाभूमीचे दर्शन घेतले

नागपूरः अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाही उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी बृजलाल खाबरी यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी अ. भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दलित चेहरा म्हणून समोर केले जात असताना शशी थरूर यांनी शनिवारी नागपुरात दीक्षाभूमीला भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी ‘लोकमत भवन’ला भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी थरूर यांचे स्वागत केले. यावेळी थरूर म्हणाले, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनाही पारदर्शी निवडणूक हवी आहे. ते कुणालाही समर्थन देणार नाही, हे देखील स्पष्ट आहे. आपल्याला काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी समर्थन दिले असून देशभरातील प्रतिनिधींकडूनही समर्थन मिळत असल्याचा दावा, थरूर यांनी केला. पक्षाचे मुख्य निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी सर्वच राज्यांची प्रदेश प्रतिनिधींची यादी दिली आहे. मात्र, बऱ्याच राज्यांच्या यादीमध्ये प्रदेश प्रतिनिधींचे पूर्ण नाव नाही. काहींचे पत्ते नाही तर काहींचे मोबाइल नंबरही नाहीत. उत्तर प्रदेशात तर एक हजारावर प्रतिनिधी आहेत. त्यांचे संपर्क क्रमांकच नाहीत. त्यामुळे उरलेल्या १६ दिवसांत सर्वांशी संपर्क साधने एक मोेठे आव्हान आहे. तरी आपण सर्वांशी संपर्कासाठी नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. ५० टक्के तिकीट हे ५० वर्षे वयाखालील व्यक्तिंना दिली जावी, असा ठराव जयपूरच्या शिबिरात घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी व्हावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रिंगणातून माघार नाहीच

- कुणालातरी तत्त्वांसाठी उभे राहावेच लागेल. त्यामुळेच आपण ही निवडणूक लढत आहे. अनेकांकडून माघार घेण्यासाठी निरोप आले आहेत. मात्र, आपण रिंगणातून माघार घेणार नाहीत, असेही थरूर यांनी स्पष्ट केले. यावेळी आमीन झवेरी, माजी आ. आशिष देशमुख, प्रदेश सचिव हैदरअली दोसानी उपस्थित होते.

भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या हिताची

- राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’ काँग्रेस पक्षाच्या हिताची आहे. या यात्रेमुळे देशभरातील काँग्रेसजनांमध्ये उत्साह वाढत आहे. या यात्रेतून एक नवा जयप्रकाश नारायण उदयास येणार आहे.

गांधी कुटुंबीय ही पक्षाची ताकद आहे. लोक त्यांच्यावर, त्यांनी केलेल्या त्यागामुळे मनापासून प्रेम करतात, असेही थरूर म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी