यश बोरकर खून प्रकरण : संतोष काळवेच्या फाशीवर बुधवारी हायकोर्टात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 09:01 PM2019-08-13T21:01:56+5:302019-08-13T21:03:29+5:30

११ वर्षीय निरागस बालक साहिल ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून प्रकरणातील आरोपी संतोष अरविंद काळवे (२६) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ बुधवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे.

Yash Borkar murder case: A decision in the High Court on Wednesday on the hanging of Santosh Kalve | यश बोरकर खून प्रकरण : संतोष काळवेच्या फाशीवर बुधवारी हायकोर्टात निर्णय

यश बोरकर खून प्रकरण : संतोष काळवेच्या फाशीवर बुधवारी हायकोर्टात निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देसहा वर्षांपूर्वी अपहरण करून केली होती हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ११ वर्षीय निरागस बालक साहिल ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून प्रकरणातील आरोपी संतोष अरविंद काळवे (२६) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ बुधवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली आहे.
आरोपी मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. तो खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. परंतु, त्याने वस्तीतील लोकांना तो पोलीस असल्याचे सांगितले होते. पीडित बोरकर कुटुंबही खापरीतच राहते. आरोपीची बोरकर कुटुंबाशी व यशसोबत चांगली ओळख होती. त्याने याचाच गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. १० जून २०१३ रोजी यश घराजवळच्या परिसरात मित्रांसोबत खेळत होता. दरम्यान, आरोपी मोटरसायकलने तेथे गेला व त्याने यशला चिप्स व कोल्डड्रिंकचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले. आरोपी ओळखीचा असल्यामुळे यश बेफिकिर होऊन त्याच्या मोटरसायकलवर बसला. त्यानंतर आरोपीने यशला मिहान उड्डाणपुलाच्या खाली नेले व तेथे त्याचा काँक्रिटच्या दगडाने ठेचून खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयासमक्ष प्रकरण सादर केले आहे तसेच, आरोपीने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे. आरोपीतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.

 

Web Title: Yash Borkar murder case: A decision in the High Court on Wednesday on the hanging of Santosh Kalve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.