शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नागपुरात  यशवंत मनोहर यांचा रविवारी  अमृत महोत्सवी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 10:03 PM

महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी २६ मार्च रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहे. त्यानिमित्त येत्या ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. यशवंत मनोहर अमृत महोत्सव सोहळा संयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देसुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी २६ मार्च रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहे. त्यानिमित्त येत्या ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. यशवंत मनोहर अमृत महोत्सव सोहळा संयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध विचारवंत व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे राहतील. डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि पुणे येथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील हे अध्यक्षस्थानी राहतील.पत्रपरिषदेला संयोजन समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, स्वागताध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम, कार्याध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, सचिव डॉ. प्रकाश खरात, अजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.जनार्दन वाघमारे यांना यशवंत मनोहर पुरस्कारडॉ. यशवंत मनोहर यांच्या अमृत महेत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या विद्यार्थ्यांनी दहा लक्ष रुपये जमा करून त्या निधीतून त्यांच्या नावाने राज्यातील किंवा देशातील परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी डॉ. यशवंत मनोहर पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. हा पहिला पुरस्कार उपेक्षितांचे अंतरंग जाणून आयुष्यभर लेखन करणारे विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांना देण्यात येणार आहे. ३१ हजार रुपये रोख, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ३ जून रोजी सकाळी १० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह राष्ट्रभाषा संकुल शंकरनगर चौक येथे देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. यावेळी लोकमतचे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार प्रमुख अतिथी राहतील. डॉ. पी.डी. पाटील अध्यक्षस्थानी राहतील. या निधीतून नागपूर विद्यापीठातून मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी दहा हजारांचा पुरस्कारही देण्यात येणार आहे.

टॅग्स :marathiमराठीnagpurनागपूर