लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या अस्तित्वात असलेले यशवंत स्टेडियम तोडून येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम बांधले जाईल. हे स्टेडियम जमिनीच्या आत चार मजले असेल. खेळाच्या मैदानासह इन्डोअर खेळांसाठी व्यवस्था असेल. याशिवाय फुड मॉल, बाजार, पार्किंगसाठी मोकळी जागा राहील. हे स्टेडियम शहराचे आकर्षण राहील असा विकास केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी पूर्व लक्ष्मीनगर मैदानावर झाली. बैठकीच्या समारोपप्रसंगी गडकरी यांनी शहरात केलेल्या विविध विकास कामांचा आलेख मांडला. गडकरी म्हणाले, नागपूर- हैदराबाद रस्त्याचा डीपीआर तयार होत आहे. आता सिंचन खाते आपल्याकडे आल्यामुळे विदर्भातील सिंचनाकडेही लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे व दक्षिण- पश्चिम मंडळाचे अध्यक्ष रमेश भंडारी यांच्या हस्ते गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.अजनी किंवा खापरीत मल्टी मोडल हबअजनी रेल्वे स्टेशन किंवा खापरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मल्ट्री मोडल हब तयार करण्याची योजना आहे. २२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री, शहरातील सर्व आमदार, महापौर यांच्या समक्ष याबाबतचे प्रेझेंटेशन होणार आहे. यासाठी आपल्या मंत्रालयाने ८०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे गडकरी यांनी सांगितले.नागनदीसाठी दिल्लीत बैठकनागनदीचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण करण्यासाठी नुकतेच ‘जायका’च्या चमूने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन २०१९ मध्ये काम सुरू करण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यापूर्वीच हे काम सुरू करायचे आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात दिल्लीत आपली ‘जायका’च्या चमूसोबत बैठक होणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.रखडलेल्या प्र्रकल्पांसाठी दटके समितीलंडन स्ट्रीट हा प्रकल्प पूर्ण व्हायचा राहिला, याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. महापालिकेतर्फे घोषणा करण्यात आलेले असे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी माजी महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करावी, असे निर्देश यावेळी गडकरी यांनी दिले. सोबतच स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर, आमदार, मुख्यमंत्री व आपण केलेल्या घोषणांपैकी कोणती कामे अपूर्ण राहिली आहेत, याची यादी तयार करून त्याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली.आपल्यात गटबाजी नाहीपक्ष वाढत आहे. मात्र आपल्यात कुठलीही गटबाजी नाही, वादविवाद नाहीत. आपण परिवार म्हणून काम करीत आहोत. असेच वातावरण कायम ठेवा, असे आवाहन गडकरी यांनी केले. त्यांचा हा टोला काँग्रेसमधील गटबाजीवर असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती. पक्षात येणाºया नवीन कार्यकर्त्यांना सामावून घ्या, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यशवंत स्टेडियम होणार ग्लोबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:41 AM
सध्या अस्तित्वात असलेले यशवंत स्टेडियम तोडून येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम बांधले जाईल. हे स्टेडियम जमिनीच्या आत चार मजले असेल. खेळाच्या मैदानासह इन्डोअर खेळांसाठी व्यवस्था असेल.
ठळक मुद्देनितीन गडकरी : भाजपाच्या शहर कार्यकारिणीत घोषणा