लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघातात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या यवतमाळ येथील ५२ वर्षीय व्यक्तीचे शुक्रवारी नागपुरात अवयव दान करण्यात आले. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याच्या दु:खातही पत्नी आणि नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.भालार टाऊनशिप भालार, यवतमाळ येथील विनोद गोदरुजी वाघमारे (५३) असे अवयवदात्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, १ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता विनोद वाघमारे आपल्या दुचाकीने यवतमाळच्या वणी भालदार रोडने जात असताना अचानक एका वन्य प्राण्याने दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या मेदूला जबर मार बसला. त्यांना तातडीने यवतमाळ येथील एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. गंभीर प्रकृती पाहता वाघमारे यांना नागपुरातील लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ.नीलेश अग्रवाल व न्यूरोफिजीशियन डॉ. पराग मून यांनी तपासणी केल्यावर ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाल्याचे निदान केले. त्यांनी याची माहिती त्यांच्या पत्नी संघमित्रा व जवळच्या नातेवाईकांना दिली. सोबतच अवयव दानाचे आवाहनही केले. त्या दु:खातही पत्नी संघमित्रा यांनी पुढाकार घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. हॉस्पिटलने ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) याची माहिती दिली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात नागपूर झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली. ‘ब्रेन डेड’ व्यक्तीचे एक मूत्रपिंड न्यू इरा हॉस्पिटलमधील ४० वर्षीय महिलेला देण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलमधील ५७ वर्षीय पुरुषाला देण्यात आले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. एस.जे. आचार्य, डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. अमित देशपांडे, डॉ. रोहित गुप्ता यांनी केली तर केअर हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, डॉ. धनंजय बोरकर, डॉ. स्वानंद चौधरी, डॉ. दीपाली गोमासे, डॉ. नितीन चोपडे व शुभांगी पोकळे यांनी केली.२७ वे यकृत प्रत्यारोपणवाघमारे यांच्या अवयवदानामुळे नागपुरात २७ वे यकृत प्रत्यारोपण होऊ शकले. न्यू इरा हॉस्पिटलमधील यकृत निकामी झालेल्या ४६ वर्षीय पुरुषाला हे यकृत दान करण्यात आले. ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल व डॉ. निधीश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहिल, डॉ. सविता, डॉ. अश्विन चौधरी व व शुभम राऊत यांनी केली.दोन मूत्रपिंडाचे दान‘ब्रेन डेड’ व्यक्तीचे एक मूत्रपिंड न्यू इरा हॉस्पिटलमधील ४० वर्षीय महिलेला देण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलमधील ५७ वर्षीय पुरुषाला देण्यात आले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. एस.जे. आचार्य, डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. अमित देशपांडे, डॉ. रोहित गुप्ता यांनी केली तर केअर हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, डॉ. धनंजय बोरकर, डॉ. स्वानंद चौधरी, डॉ. दीपाली गोमासे, डॉ. नितीन चोपडे व शुभांगी पोकळे यांनी केली.
यवतमाळच्या व्यक्तीचे नागपुरात अवयवदान : तिघांना मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 9:33 PM
अपघातात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या यवतमाळ येथील ५२ वर्षीय व्यक्तीचे शुक्रवारी नागपुरात अवयव दान करण्यात आले. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याच्या दु:खातही पत्नी आणि नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.
ठळक मुद्देवाघमारे कुटुंबीयांचा पुढाकार