शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

२०३० मध्ये जगभरात १६५ मिलियन टन घनकचरा

By admin | Published: April 12, 2017 1:58 AM

जगभरात घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर रूप घेत असून केवळ २८ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.

अशोक पांडे : घनकचरा व्यवस्थापनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला ‘नीरी’त प्रारंभनागपूर : जगभरात घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर रूप घेत असून केवळ २८ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. २०३० मध्ये हा जागतिक प्रश्न बनेल व १६५ मिलियन टन घनकचरा निर्माण होईल. याचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीदेखील आपली जबाबदारी ओळखायला हवी, असे मत मोहाली ‘सीआयएबी’चे (सेंटर आॅफ इनोव्हेटिव्ह अ‍ॅन्ड अप्लाईड बायोप्रोसेसिंग) ज्येष्ठ संशोधक डॉ.अशोक पांडे यांनी व्यक्त केले. ‘नीरी’, शासकीय विज्ञान संस्था, शासकीय न्यायसहायक संस्था,‘स्वच्छ नागपूर’ ही स्वयंसेवी संस्था व मोहता महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.‘विकसनशील देशांत एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावरील या परिषदेचे मुख्य अतिथी म्हणून हाँगकाँग बाप्टिस्ट विद्यापीठाचे संचालक प्रा.जोनाथन वांग, ‘सीएसआयआर’च्या (कौन्सिल आॅफ सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीअल रिसर्च) भरती व मूल्यांकन मंडळाचे चेअरमन डॉ.सतीश वटे, ‘सीएसआयआर-सीमफर’चे (सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मायनिंग अ‍ॅन्ड फ्युअल रिसर्च) संचालक डॉ.प्रदीप सिंह, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.रामदार आत्राम, शासकीय न्यायवैद्यक संस्थेचे संचालक डॉ.जयराम खोब्रागडे व आयोजन सचिव डॉ.सुनील कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.जगातील तीन चतुर्थांश कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात येत नाही. ‘ई-वेस्ट’चा प्रश्न तर आणखी गंभीर आहे. भारत तर ‘ई-वेस्ट’साठी ‘डम्पिंग यार्ड’च झाला आहे. त्यामुळेच सर्वसमावेशक धोरण निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा उपक्रमात ‘नीरी’ने नेतृत्व करावे, असे प्रतिपादन अशोक पांडे यांनी केले. प्रा.जोनाथन वांग यांनी जगभरातील घनकचरा व्यवस्थापन प्रणालींवर प्रकाश टाकला. घनकचरा व्यवस्थापनासाठी एकमेकांची नक्कल करण्यापेक्षा आवश्यकतेनुसार धोरणे ठरविली गेली पाहिजेत, असे ते म्हणाले. डॉ.सुनील कुमार यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या दिवशी सहा तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. देश-विदेशातून १०० हून अधिक संशोधक यात सहभागी झाले आहेत.डॉ.सतीश वटे यांनी यावेळी घनकचरा व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचे किती महत्त्व आहे, यावर भाष्य केले. वैज्ञानिकांनी समाजाचे हित लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे. आता संशोधन प्रयोगशाळांमधून प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर नेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ.प्रदीप सिंह यांनी केले. या आंतरराष्ट्रीय संमेलनातून घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील अनेक सकारात्मक बाबी समोर येतील. यातून प्रशासनालादेखील दिशा मिळेल, असा विश्वास डॉ.राकेश कुमार यांनी व्यक्त केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी जागृती आवश्यक असल्याचे मत डॉ. खोब्रागडे यांनी व्यक्त केले. डॉ.आत्राम यांनी या परिषदेचे महत्त्व विषद केले.(प्रतिनिधी)सहापट वाढणार घनकचरा : निकोलस थेमेलिसअमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचे संचालक प्रा.निकोलस थेमेलिस यांनी ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून ‘आशियातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. आताच्या स्थितीत १० टक्के घनकचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याला परत उपयोगात आणले जात आहे. मात्र ९० टक्के कचरा ‘डम्पिंग यार्ड’मध्ये पडून राहतो. कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने आशियामध्ये जमीन प्रदूषण वाढत आहे. चीनमध्ये कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करणारे २०० हून अधिक प्रकल्प आहे. त्याच धर्तीवर भारतानेदेखील पुढाकार घ्यायला हवा. देशात चार ते पाच प्रकल्पच असून यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. २०३० पर्यंत आशियातील घनकचरा सहा पटींनी वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.कचरा विलग करण्यासाठी पदवी लागते का ?यावेळी प्रा.जोनाथन वांग यांनी प्रशासनाच्या धोरणांवरच बोट ठेवले. उगमाच्या ठिकाणीच कचरा विलग झाला तर घनकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. मात्र कचरा विलग होणे शक्य नाही, असा दावा प्रशासनांकडून करण्यात येतो. कचरा विलग करण्यासाठी कुठल्याही पदवीची आवश्यकता असते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.