लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत-चीन वादात यंदा दसरा आणि दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार असल्याचे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यक्तकेले आहे. सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीय आत्मनिर्भर बनणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर अभियानाला स्थानिक स्तरावर प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय कॅटने घेतला आहे. १० जूनला चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. यावर्षी राखी आणि गणेश चतुर्थी सणात लोकांनी चिनी वस्तूंचा बहिष्कार करीत भारतीय वस्तूंची खरेदी केली. दिवाळी सणातही भारतीय सजावटीच्या वस्तूंची ग्राहकांना विक्री करण्यास व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे. गेल्यावर्षी चीनने भारतीय सणांमध्ये बाजारावर ताबा मिळविण्याची कोणतीही संधी सोडली नव्हती. पण आता भारतीय व्यापाऱ्यांनी सणांमध्ये बाजारपेठा चिनी वस्तूमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यातच ‘भारतीय वस्तू, माझा अभिमान’ या कॅटच्या अभियानाचा व्यापारी हिस्सा बनले आहेत. चीन दरवर्षी सणांमध्ये भारतात जवळपास ४० हजार कोटींच्या वस्तूंची निर्यात करते. पण कॅटच्या अभियानाने चीनला या वस्तूंच्या निर्यातीवर पाणी सोडावे लागले आहे.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, या अभियानांतर्गत यावर्षीच्या सणांच्या दिवसात कॅटने दिल्लीसह संपूर्ण देशात ३५० क्लस्टर नव्याने उदयास आणले आहेत. दिवाळी सणांमध्ये पूजा आणि दुकान व घरांच्या सजावटीच्या वस्तू याच क्लस्टरमधून मिळणार आहेत. या वस्तूंमध्ये भारताची प्राचीन परंपरा आणि संस्कृती दिसेल. यामध्ये मातीपासून तयार केलेले कलात्मक व पेंट केलेले दिवे, दारावर लावण्यात येणारी माळ, झुंबर, लक्ष्मीचे पाय, शुभ-लाभाचे चिन्ह, सजावटी झालर, हँगिंग, खादीपासून तयार सजावटी वस्तू, मोती, बीडपासून तयार वस्तू, मधुबनी व मैथिली पेंटिंगसह अनेक वस्तूंचा समावेश आहे. पूर्वीही अशा वस्तू देशात तयार व्हायच्या, पण त्यांना बाजारपेठ मिळत नव्हती. आता कॅटने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या वस्तू व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत व्यापारी आणि लोकांनी न्याव्यात, असे आवाहन कॅटने केले आहे.
यंदा दिवाळी छोट्या कारागिरांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 8:52 PM
भारत-चीन वादात यंदा दसरा आणि दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार असल्याचे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यक्तकेले आहे. सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीय आत्मनिर्भर बनणार आहेत.
ठळक मुद्दे भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करा : कॅटचे ग्राहकांना आवाहन