शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

यंदा गुजरातचे तीळ आणि उत्तर प्रदेशचा गूळ करणार तोंड गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 10:17 AM

तीळ आणि गुळाच्या किमतीत थोडी दरवाढ झाल्यामुळे तीळसंक्रातीत तिळगुळाचा स्वाद चाखणाऱ्यांना यावर्षी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे.

ठळक मुद्देविविध राज्यातील गुळांची रेलचेल

आॅनलाईन लोकमतनागपूर : तीळ आणि गुळाच्या किमतीत थोडी दरवाढ झाल्यामुळे तीळसंक्रातीत तिळगुळाचा स्वाद चाखणाऱ्यांना यावर्षी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. गेल्यावर्षी किरकोळमध्ये पांढऱ्या तिळाचे भाव ९० ते ११० रुपये आणि लाल तीळ १२० ते १३० रुपये होते. यंदा भावात १० टक्के वाढ झाल्यामुळे पांढरे तीळ १२० रुपये आणि लाल तिळाचे भाव १४० रुपयांवर पोहोचले आहेत.किराणा बाजाराची पाहणी केली असता प्रत्येकाच्या दुकानात काऊंटरवर तीळ आणि गूळ दिसून आले. विशेषत: तिळगुळाच्या विविध व्यंजनांचे शौकिन इतवारी किराणा ओळ आणि रेवडी ओळीत गर्दी करीत आहेत. किराणा ओळीत तिळाचे लाडू, पापडी, शेंगदाणा, सुका मेवा, गूळ आदीं ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.किराणा व्यावसायिक सलीम कुरेशी यांनी सांगितले की, नागपूरकरांसह बाहेर गावातील लोक तीळ, गूळ आणि अन्य सामग्री खरेदी करण्यासाठी नागपुरात येतात. सामग्रीची विविधता आणि किफायत दरांमुळे लोकांची या बाजारपेठांना पसंती आहे. नागपुरात तीळ गुजरातेतून येत आहे. तसे पाहता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही तिळाचे उत्पादन होते. पण गुजरात येथील तिळाला लोकांची पसंती आहे.विभिन्न राज्यातील गुळाची रेलचेलसर्वाधिक विक्रीचा गुलाबी रंगाचा गूळ उत्तर प्रदेशातून येत असून मध्य प्रदेशातील गुळापेक्षा याला लोकांची जास्त पसंती आहे. उत्तर प्रदेशातील बट्टी गूळ ४० रुपये किलो आहे तर कोल्हापूरचा गूळ एक किलो वजनात आहे. त्याला पसंती कमी आहे. यामध्ये सेंद्रीय गूळ ६० रुपये आणि बिगर-सेंद्रीय गूळ ५० रुपये किलो आहे. याशिवाय काही दुकानांमध्ये लाल रंगाचा गोड गूळ विक्रीस उपलब्ध आहे.निरोगी आरोग्यासाठी गूळ आणि तिळाचे सेवन अत्यंत आवश्यक आहे. थंडीच्या मोसमात तिळगुळाचा स्वाद लोकांना जास्त आकर्षित करणारा आहे. किराणा व्यावसायिकाने सांगितले की, जबलपूर, इंदूर येथे सर्वाधिक विकणाऱ्या गजकची नागपुरात फार कमी विक्री होते. लोक तिळगूळ खरेदी करून लाडू बनविणे पसंत करतात. संक्रांत आणि गणेशचतुर्थी सणात ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ हे वाक्य सर्वत्र ऐकायला मिळते. संक्रांतीसाठी व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिक