नागपूर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अद्यापही बंद आहेत. ती उघडण्यासाठी आंदोलने सुरू असली तरी सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदाचा श्रावणमासही घरूनच शिवआराधाना करण्यात जाईल की सरकारकडून मंदिरात प्रवेशाला परवानगी मिळेल, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
नागपुरात अनेक प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेलंगखेडी, प्राचीन कल्याणेश्वर मंदिराला मोठा इतिहास आहे. महाल येथील कल्याणेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिरालाही पौराणिक महत्व आहे. या सोबतच मानकापूर येथील प्राचीन शिवमंदिर, नंदनवनमधील भुयारी शिवमंदिर, सोनेगावचे पाताळेश्वर शिवमंदिर भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. जागनाथ बुधवारी येथील साडेसात शिवलिंग असलेले स्वयंभू शिवमंदिर एकमेव आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात या मंदिरांना यात्रेचे स्वरूप येते. पूजा साहित्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र मागील वर्षापासून हा व्यवसायच ठप्प आहे.
...
श्रावण सोमवार
यंदाचा श्रावण महिना २९ दिवसांचा आहे. पाच श्रावण सोमवार आले असले तरी शेवटचा सोमवार पिठोरी अमावस्येला आला आहे. त्यामुळे तो पाळला जाणार नाही, अशी शक्यता आहे.
पहिला - २६ जुलै : शिवमूठ तांदळाची
दुसरा - २ ऑगस्ट : शिवमूठ तिळाची
तिसरा -९ ऑगस्ट : शिवमूठ मुगाची
चौथा -१६ ऑगस्ट : शिवमूठ जवाची
...
आर्थिक उलाढाल ठप्प
२५ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. महिनाभर सर्व मंदिरांमध्ये होणाऱ्या पूर्जाअर्चनेतृून अर्थचक्र वाढते. मात्र दोन वर्षापासून ते थांबले आहे. नागपुरातील सर्व मंदिरांमिळून श्रावणात पूजा साहित्यांमधून पाऊण ते एक कोटी रुपयांवर उलाढाल होते. बहुतेक विक्रेते अगदीच कमी भांडवलातून व्यवसाय सुरू करणारे असल्याने त्यांनी केलेली या व्यवसायातील गुंतवणूक वाया गेली आहे.
...
व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया
१) दुसऱ्या लॉकडाऊननंतर मंदिरे सुरू होतील, अशी अपेक्षा होती. पूजा साहित्य खरेदी करून ठेवले होते. मात्र सरकार मंदिरे उघडण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. असे झाल्यास व्यवसायात तोटाच सहन करावा लागणार आहे.
- खंडारे, पूजा साहित्य विक्रेते
२) श्रावण महिन्यात दर सोमवारचा व्यवसाय ३० ते ४० हजार रुपयांचा असायचा. या महिन्यात दीड लाखांवर व्यवसाय असतो. यंदा व्यवसायावर ग्रहण आहे. सरकारने परवानगी दिली नाही तर मोठा व्यवसाय सर्वांच्या हातून जाणार आहे.
- विजय वंजारी, अध्यक्ष, उत्पादक व फुल विक्रेता संघ
...