शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

यंदाची नवरात्र-दिवाळी उजळणार गोमय पणत्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:52 AM

भारतात बहुतांश व्यवसाय आत्मनिर्भरतेच्या कसोटीस खरे उतरतात. मात्र, स्पर्धेच्या उचापतीत ती जाणीव नव्हती. हीच बाब हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या आर्थिक उलाढालीला वेग देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या नाऱ्याला लीलया उचलून धरत उमरेड तालुक्यातील महिला स्वयंभू होण्याच्या दिशेने अग्रेसर झाल्या आहेत.

ठळक मुद्देआत्मनिर्भर महिला : गांधी जयंतीला होणार एक लाख दिव्यांची सजावटउमरेड तालुक्यातील महिलांची झेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात बहुतांश व्यवसाय आत्मनिर्भरतेच्या कसोटीस खरे उतरतात. मात्र, स्पर्धेच्या उचापतीत ती जाणीव नव्हती. हीच बाब हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या आर्थिक उलाढालीला वेग देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या नाऱ्याला लीलया उचलून धरत उमरेड तालुक्यातील महिला स्वयंभू होण्याच्या दिशेने अग्रेसर झाल्या आहेत. कोरोना संक्रमणात पसरलेल्या अंधारात चाचपडणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी या महिला पणत्यांचा आधार देणार आहेत. यंदाची नवरात्र-दिवाळी त्यांनीच केलेल्या पणत्यांनी उजळणार आहे.

नागपुरात कार्यरत असलेली स्वयंसेवी संस्था निसर्ग विज्ञान मंडळाच्या मार्गदर्शनात उमरेड तालुक्यातील कष्टकरी महिलांना स्वयंभू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मंडळाच्या मार्फत गोमय वस्तूंच्या निर्मितीवर बऱ्याच काळापासून संशोधन सुरू आहे आणि त्या संशोधनातून निर्मित वस्तूंना उद्योगाचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने ‘गोमय समृद्धी’चा नारा बुलंद करण्यात येत आहे. गाय आणि शेतीवर निर्भर उद्योगांना चालना देण्यात येत आहे. त्यातच आत्मनिर्भरतेच्या घोषणांनी या प्रयत्नांना बळ दिले. दरम्यान गणपतीच्या मूर्तीही शेण, माती, गोमूत्र आदी पंचगव्याच्या माध्यमातून बनविण्यात आल्या. आता पुढे नवरात्र आणि दिवाळी येत आहे. या काळात घरोघरी दिव्यांची गरज भासणार आहे. त्यातच वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाने यंदा गांधी जयंतीला एक लाख पणत्या उजळण्याचा प्रण केला आहे. हा संयोग जोडत या महिला हे दिवे तयार करत आहेत. २ आॅक्टोबरला गांधी जयंतीला सेवाग्राम येथील गांधी पुतळा ते बापू कुटी दरम्यान एक लाख पणत्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत आणि या पणत्या उमरेडच्या महिला साकारत आहेत. २५ महिलांची ही फौज मिळेल त्या वेळेत हे दिवे साकारत आहेत. त्यातच पुढे नवरात्र आणि दिवाळीही असणार आहे. त्यामुळे, इवल्याशा पणत्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला प्रखर करणार आहेत.ऋतुगंध गटातील महिला करत आहेत काम - विजय घुगेमधल्या काळात महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने उमरेड तालुक्यातील काही गावातील महिलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यातून २५ महिलांचा ऋतुगंध हा गट तयार करण्यात आला. या महिला पूर्णवेळ पणत्या तयार करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. कौशल्याला व्यावसायिक जोड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून अनेकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे निसर्ग विज्ञान मंडळाचे विजय घुगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकल्पाला ग्रामायण प्रतिष्ठानचे अनिल सांबरे, नेत्रवनचे समन्वयक दीपक शाहू यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Diwaliदिवाळीnagpurनागपूर