लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (नरखेड) : तालुक्यातील येनिकोनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाकरिता एक व सदस्य पदाकरिता केवळ सात अर्ज आल्यामुळे निवडणूक अविरोध झाली.नागपूर जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम म्हणून नावलौकिकास आलेल्या येनिकोनी ग्रामपंचायतची सार्वजनिक निवडणूक जाहीर झाली. मागची निवडणूक अविरोध न झाल्यामुळे राज्यस्तरावर ग्रामपंचायतचा नंबर लागला नव्हता. याची खंत गावातील नागरिकांना होती. ती भरपाई यावेळी भरून काढण्यासाठी नागरिकांनी चंग बांधला. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे मन वळविण्यास नागरिकांना यश आले व निवडणूक अविरोध करण्याचा निर्णय झाला. गेल्या पाच वर्षांत विद्यमान सरपंच मनीष फुके यांच्या प्रयत्नाने गावाचा चेहरामोहरा बदलला. तंटामुक्त,आदर्श ग्राम,जिल्हा स्मार्ट ग्राम अशी अनेक पारितोषिके ग्रामपंचायतीने मिळविली. भविष्यात राज्यातून प्रथम क्रमांक मिळविण्याकरिता गावकऱ्यांनी मनीष फुके यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या पत्नी उषा फुके यांना सर्वसाधारण महिला सरपंचपदी अविरोध निवडून दिले. इतर सदस्यांमध्ये मनीष भय्याजी फुके,सोमराज भागवत पंचभाई, प्रभाकर उपासराव सलामे, रेखा दशरथ तुमडाम, उज्ज्वला बळवंत राऊत, अर्चना अशोक खापरे, रेखा गणपती गावंडे हे अविरोध सदस्यपदी निवडून आले. गावकऱ्यांनी गावातून ढोलताशाच्या गजरात गुलाल उधळून जल्लोष करीत निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांची मिरवणूक काढली.
नागपूर जिल्ह्यातील येनिकोनी ग्रामपंचायत निवडणूक अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:54 IST
नरखेड तालुक्यातील येनिकोनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाकरिता एक व सदस्य पदाकरिता केवळ सात अर्ज आल्यामुळे निवडणूक अविरोध झाली.
नागपूर जिल्ह्यातील येनिकोनी ग्रामपंचायत निवडणूक अविरोध
ठळक मुद्देसरपंचपदी उषा मनीष फुके : गावात नवा आदर्श