लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : पाेलिसांच्या पथकाने रविवारी (दि. २२) सायंकाळी येरला शिवारातील जुगारावर धाड टाकत जुगार खेळणाऱ्या चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४६ हजार ८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये नरेश उडनलाल ठाकूर (४०), सुनील निवृत्त दवंडे (४०), हेमंत राजू माेंडे (२०) व गाेलू ऊर्फ रामेश्वर देवशंकर वर्मा (२९) चाैघेही रा. येरला, ता. नागपूर (ग्रामीण) यांचा समावेश आहे. कळमेश्वर पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना येरला येथील डागा मूकबधिर शाळेजवळ जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने पाहणी केली व जुगार खेळला जात असल्याचे स्पष्ट हाेताच धाड टाकली.
यात जुगार खेळणाऱ्या चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४,०८५ रुपये राेख, ४९ हजार रुपयांचे तीन माेबाईल हॅण्डसेट, ९२ हजार रुपयांच्या देान माेटरसायकली व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ४६ हजार ८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, हवालदार राजकुमार काेल्हे, ललित उईके, राजेश कुमरे, स्वप्निल लाकडे यांच्या पथकाने केली.