शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

यो यो हनीसिंगला ऑस्ट्रेलिया, दुबईला जाण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 10:51 PM

सत्र न्यायालयाने गुरुवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला येत्या १० ते २५ फेब्रुवारीपर्यंत दुबई आणि १ ते ३१ मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, विमानाची तिकिटे, रहिवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक यासह दौऱ्याची संपूर्ण माहिती सदर पोलिसांना सादर करण्याचा आदेश दिला व दौऱ्यावरून परत आल्यानंतर न्यायालयात हजेरी लावण्यास सांगितले.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : अटींचे पालन करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला येत्या १० ते २५ फेब्रुवारीपर्यंत दुबई आणि १ ते ३१ मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, विमानाची तिकिटे, रहिवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक यासह दौऱ्याची संपूर्ण माहिती सदर पोलिसांना सादर करण्याचा आदेश दिला व दौऱ्यावरून परत आल्यानंतर न्यायालयात हजेरी लावण्यास सांगितले.यासंदर्भात हनीसिंगने अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हा निर्णय दिला. हनीसिंगवर अश्लील गाणी गाण्याचा आरोप आहे. यासंदर्भात व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी केलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. तसेच, विविध अटी निश्चित करून दिल्या आहेत. त्यामुळे त्याने हा अर्ज दाखल केला होता. यापूर्वी हनीसिंगला बँकॉक, दुबई, लंडन व हवाना येथे जाण्याची परवानगी देण्यात आली होती. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे व अ‍ॅड. आशिष किल्लेदार तर, तक्रारकर्ते जब्बल यांच्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Honey Singhहनी सिंहDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय