१७७ बंदिवान : ३ महिन्यांची शिक्षा होणार कमी नागपूर : नियमित योगा केल्यास मन आणि शरीराला निश्चित लाभ होतो. नेहमीच तणावात जगणाऱ्या कारागृहातील बंदिवानांना त्यामुळेच योगा करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आता बंदिवानांना योगाचा पुन्हा एक फायदा होणार आहे. त्यांना एकूण शिक्षेतून तीन महिन्यांची सूटही मिळणार आहे. होय, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सकाळी येथील मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने तशी घोषणाच केली आहे. योगाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांपैकी १७७ कैद्यांना त्यांच्या शिक्षेतून ३ महिन्यांची सूट मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून वर्षभरापूर्वी मध्यवर्ती कारागृहात एक योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, जे बंदिवान योगाभ्यास करून परीक्षा पास करतील, अशांची एकूण शिक्षेपैकी ३ महिन्यांची शिक्षा कमी करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. येथील कारागृहात ३५० बंदिवान नियमित योगाभ्यास करतात. त्यातील १६७ पुरुष आणि २४ महिला बंदिवानांनी योगासनाची मे २०१६ मध्ये परीक्षा दिली होती.
योगा कराल तर शिक्षा माफ !
By admin | Published: June 22, 2016 2:53 AM