सुबोध चहांदेदेशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, सांस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउध्दार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते. इ.स.२०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (द ग्रेटेस्ट इंडियन) या भारताच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातील शीर्ष १०० विद्वानांची यादी तयार केली त्यात त्यांनी प्रथमस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर एक महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला.इंग्लंडच्या आॅक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या दहा हजार वर्षांमधील जगातील सर्वात प्रभावशील शंभर विश्वमानवांची यादी प्रकाशित केली. त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर भगवान गौतम बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रगाढ विद्वत्ता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४ विषयांवर प्रभुत्व होते, एवढ्या साऱ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत असे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापीठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे.‘भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व द्या,गरिबीमुळे स्वाभिमान गहाण टाकू नका.’डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘मी माझ्या आयुष्याची ५५ वर्षे जर सरकारी नोकरीत असतो तर मला आता सेवानिवृत्त होण भागच पडले असते. परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव ध्येयाखातर बड्या पगाराच्या नोकऱ्या नाकारल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या समोर एकच ध्येय बनवा आणि आपल्या बांधवांना एकत्रित करा. कारण तुम्ही एकत्र आल्याशिवाय कुणाशीही लढा देऊ शकत नाहीत. कारण एकीचे बळ हे कुणीही जगात मोडू शकत नाही. म्हणून खूप शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना त्यांनी केलेल्या आंदोलनाची पुन्हा एकदा आठवण करून सुज्ञानाच्या निर्मळ झऱ्याला श्रद्धांजली वाहू.१९२७ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू मंदिरांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली व २ मार्च १९३० सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. आंबेडकरी चळवळीतील तरुणानी रामकुंडात उडी घेतली, तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले.सत्याग्रहींचा जोश व दृढनिश्चय पाहून त्यांनी राम मंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आदेश दिले. पुणे करार करताना यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबांनी मुख्य सही केली तर सवर्णाच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली. नथुराम गोडसेसारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांनी गांधीजींचा प्राण वाचवावा याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये याचे अत्रे यांना दु:ख होते. पुणे करारावर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले.‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पिईलतो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होते, असे ते समाजबांधवांना सांगत. बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार ठरविण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे.बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला. त्यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला.त्या दिवशी अशोक विजयादशमी होती.(या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.) महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून त्रिशरण पंचशील ग्रहण करून त्यांनी धम्मदीक्षा घेतली व आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञांद्वारे संदेश दिला.अशा या महानमानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अशा या महानमानवाने ६ डिसेंबर १९५६ साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.सुबोध प्रकाश चहांदेजुना बगडगंज, नागपूर.मो. ९८२३८०६८९५