पर्यटकांनी स्वत:च्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने लावलेल्या फलकांवरील सूचनांकडे दुर्लक्ष करू नये.
पर्यटनस्थळी वादग्रस्त चाळे, हालचाली तसेच दारू व मटण पार्टी करू नये.
प्रेमीयुगुलांनी एकांतवासाचा शोध घेण्याच्या नादात धाेकादायक ठिकाणी जाऊ नये.
तरुणांनी अनाेळखी ठिकाणी पाेहण्याचा किंवा अंघाेळ करण्याचा माेह टाळावा.
प्रशासनाने धाेकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी किंवा ताे परिसर सील करावा.
धाेकादायक ठिकाणी बॅरेकेड्स लावून पाेलिसांनी पर्यटकांना जाण्यास मज्जाव करावा.
...
घोगरा महादेव धबधबा
माेठ्या खडकांमुळे पेंच नदीच्या पात्रात धबधबा तयार झाला आहे. त्यामुळे येथे डाेह तयार झाला आहे. पर्यटक प्रत्येक पावसाळ्यात येथे फिरायला येतात आणि खडक व दगडांवर उभे राहून तरुण व हाैशी पर्यटक ‘सेल्फी’ काढतात. काही तरुण जीव धाेक्यात टाकून या डाेहात पाेहायला किंवा अंघाेळ करायला उतरतात. अलीकडच्या काळात या डाेहामध्ये १७ जणांचा बुडून मृत्यू झाला असून, सर्व जण तरुण हाेते. मागील वर्षी पेंच धरणातील पाणी पूर्ण क्षमतेने साेडण्यात आल्याने पाण्याच्या तेज प्रवाहामुळे नदीच्या पात्रात डाेह तयार झाले आहेत. हे डाेह आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. तरुण या डाेहाच्या काठी उभे राहून ‘सेल्फी काढतात.
...
दगडांच्या रांगा
घोगरा येथील पेंच नदीच्या परिसरात दगड व खडकांच्या माेठमाेठ्या रांगा आहेत. तरुण मंडळी माैजमस्ती करण्याच्या नादात त्या उंच दगडांवर चढतात आणि ‘सेल्फी’ काढतात. त्या दगडांच्या खाली खाेल दरी आहे. दगडावरील पाय अनावधानाने घसरला तर अपघात हाेण्याची व जीव जाण्याची शक्यता असते. येथे काही वर्षापूर्वी ‘सेल्फी काढताना पाय घसरून काहींचा मृत्यूदेखील झाला आहे.
...
जबाबदारी कुणाची?
श्री क्षेत्र घोगरा हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. खोल पाण्यात पोहायला जाऊ नका, धोक्याच्या ठिकाणी ‘सेल्फी’ काढू नका अशा वारंवार सूचना देताे. पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. तरुण पर्यटक अतिउतावळेपणामुळे मृत्यू ओढवून घेतात. यात्रेच्या वेळी पोलीस बंदोबस्त लावला जाताे.
- हृदयनारायण यादव,
पोलीस निरीक्षक, पारशिवनी.