लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही दिवसांपासून उन्हाचा कहर सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे सहाजिकच पंखा, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर यांचा वापरही दिवसेंदिवस वाढत आहे. या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले आहे की नाही ही शंका उपस्थित होते व याची चाचपणी केली जाते. यात विजेचा वापर कमी व आवश्यक असेल तेवढाच केल्यास वीजबिलात बचत होणे शक्य आहे तर वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल आल्याची खात्रीही करता येते.प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे व वाढतच जाणार आहे. त्यात रोज नवनवीन विद्युत उपकरणाची भर पडत आहे. मात्र ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढला की,विजेचे बिलही वाढणार आहे. मात्र आपल्या हातात मे, जून व जुलै महिन्याचे वीज देयक आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना बिल भरमसाठ आल्याचे त्यांना वाटत असते. एखाद्या प्रकरणात कर्मचाऱ्याच्या दोषामुळे, चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, दुकान व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनंदिन वापर याची जर माहिती करून घेतली व अभ्यास केला तर आपल्यालाही सत्यता पडताळता येईल. त्यासाठी वीज देयक जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व अॅप आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या,आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपला महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीजबिलाची अंदाजित रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता.वीजबिलाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रति युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये ० ते १००, १०१ ते ३०० व ३०१ ते ५०० व ५०१ ते १००० व १००१ आणि अधिक युनिट वीजवापरासंदर्भातील दर छापलेले असतात. त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात. घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा, जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त ऊर्जा बचत होते. आपल्याला उपकरणांचे वॅट, त्याचा दैनंदिन वापर याची माहिती झाल्यास वीज बिलाचे नियोजन करण्यासाठी विजेच्या वापरावर लक्ष ठेवून वीज बिल कमी करता येईल व आलेले वीज बिल एवढे का, याचा उलगडा नक्कीच होईल.१००० वॅटचे उपकरणाचा जर एक तास वापर केला तर १ युनिट साधारणत: वीज खर्च होते, त्यामुळे एकूण विजेचे वॅट व १ युनिट विजेसाठी लागणारा वेळ यासंदभार्तील तक्ता सोबत दिला आहे. त्यामुळे या सर्व बाबींची माहिती घेतल्यास व स्वत:च याचे आॅडिट केल्यास वीजबचतीसोबतच वीजबिल नियंत्रित करणे सोपे होईल व वापरलेल्या विजेचे बिल भरताना त्रासही होणार नाही.असे तपासता येईल वीज बिलउपकरण वीज वापर (वॅट्स) एक युनिट विजेसाठी लागणारा वेळबल्ब २४/४०/६०/१०० ४०/२५/१६/१० तासरात्रीचा दिवा १०/१५ १००/६६ तास १० मिनिटेसीएफएल १०/१५/१८/२२ ९१/६६/५५/४५ तासपंखा- ३६ इंच ६० १६ तास ४० मिनिटपंखा- ४२ इंची ८० १२ तास ३० मिनिटटेबल फॅन ४० २५ तासमिक्सर, ब्लेंडर, ज्यूसर ४५० २ तास १३ मिनिटघरगुती पिठाची गिरणी ७५० १ तास २० मिनिटइलेक्ट्रीक ओव्हन १२०० ५० मिनिटइस्त्री - कमी वजनाची १००० ६० मिनिटजास्त वजनाची २००० ३० मिनिटटीव्ही १५ ६६ तास ४० मिनिटस्टिरीओ सिस्टीम ५० ते ३००० २० तास ते २० मिनिटवॉशिंग मशीन - आॅटोमॅटिक २००० ३० मिनिटसेमी आॅटोमॅटिक ४०० २ तास ३० मिनिटव्हॅक्यूम क्लिनर ९५० १ ताससंगणक २५० ४ तासवॉटर प्युरिफायर २५ ४० दिवस
आपणच तपासा आपले वीज बिल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:57 AM
आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या,आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपला महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीजबिलाची अंदाजित रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता.
ठळक मुद्देयुनिट व एकूण वापराचा करा अभ्यास :वर्गवारीनिहाय आहेत प्रति युनिट दर