पारशिवनी : मित्रासाेबत क्रिकेट खेळत असताना आराेपीने तिथे येऊन खेळण्यात अडथळा निर्माण केला. यावरून हटकल्याच्या कारणावरून आराेपीने तरुणास मारहाण केली. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील इटगाव येथे मंगळवारी (दि.२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
मिलिंद राजू काळे (२२, रा. इटगाव, ता. पारशिवनी) असे जखमी तरुणाचे नाव असून, मनीष येवले (रा. इटगाव) असे आराेपीचे नाव आहे. मिलिंद हा गावातील त्याचे मित्र सचिन गाैरखेडे, निखिल बेलेकर, अर्जुन बेलेकर व इतरांसाेबत हनुमान मंदिराजवळ क्रिकेट खेळत हाेता. अशात आराेपी मनीष येवले तिथे आला आणि मिलिंद व त्याच्या मित्रांना खेळण्यात अडथळा निर्माण करीत हाेता. यावर मिलिंदने त्याला ‘आम्हाला क्रिकेट खेळू दे, तू मधाेमध येऊ नकाे’ असे म्हणत हटकले असता, आराेपीने त्याला धक्का देऊन गिट्टीवर पाडले शिवाय, हातातील काठीने मिलिंदला मारहाण केली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी भादंवि कलम ३२५, ३२३ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस हवालदार प्रभाकर झाेड करीत आहेत.