उमरेड : राहत्या घरात गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव (मुंगलाई) येथे बुधवारी (दि.१७) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. सततच्या पाेटाच्या विकारामुळे कंटाळून त्याने आपली जीवनयात्रा संपविली.
आशिष सुरेश नारनवरे (२२, रा. चारगाव (मुंगलाई), ता. उमरेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुटुंबीयांसाेबत जेवण केल्यानंतर आशिष हा घरात एकटाच हाेता. अशात घरात खुर्ची पडल्याचा आवाज आल्याने त्याच्या वडिलांनी घरात जाऊन पाहिले असता, लाकडी फाट्याला दुपट्ट्याच्या सहाय्याने आशिषने गळफास लावल्याचे आढळून आले. वडिलांनी आरडाओरड करताच शेजारी धावून आले. शेजाऱ्यांच्या मदतीने आशिषला खाली उतरवून लगेच उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. याप्रकरणी सुरेश जंगलू नारनवरे (४५, रा. चारगाव (मुंगलाई) यांच्या तक्रारीवरून उमरेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार अजितसिंग ठाकूर करीत आहेत.