कुही : अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना वेलतूर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या वीरखंडी येथे साेमवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, मंगळवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली.
अनिल बापूराव शेंडे (३७, रा. वीरखंडी, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. मृत अनिलची पुतणी ही काका बाहेर आला नाही म्हणून त्याच्या घरी गेली असता, ताे घरातील लाकडी फाट्याला गळफास लावून मृतावस्थेत आढळून आला. लगेच तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. ही बातमी गावात पसरताच पाेलीस पाटलांनी वेलतूर पाेलिसांना सूचना दिली. ठाणेदार आनंद कविराज यांनी पाेलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.
मृत अनिलची पत्नी तिच्या आईच्या डाेळ्याचे ऑपरेशन झाले असल्याने १० दिवसापूर्वी मुलांना घेऊन माहेरी गेली हाेती. त्याला मुलगी व दाेन वर्षाचा मुलगा आहे. अनिलने आपल्या मित्रांसाेबत रंग खेळला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.