कामठी : अज्ञात कारणावरून राहत्या घरी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कामठी शहरातील न्यू खलाशी लाईन येथे मंगळवारी (दि.२२) सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
नीलेश माणिक पाटील (१८, रा. न्यू खलाशी लाईन, कामठी) असे मृताचे नाव आहे. नीलेशने स्वत:च्या घरी स्नानगृहात छताच्या हुकाला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लावला. दरम्यान त्याची आई स्नानगृहाकडे गेली असता, नीलेश छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून येताच तिने हंबरडा फाेडला. लागलीच कुटुंबीय व शेजाऱ्यांनी त्याला कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी जुनी कामठी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार अरविंद साखरे करीत आहेत.