सावरगाव : अज्ञात कारणावरून विहिरीत उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सावरगावनजीकच्या पिपळा (काेठा) येथे गुरुवारी (दि.८) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्रवीण शिवराज गाढरे (२४, रा. पिपळा (काेठा), ता. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास प्रवीणने वडिलांना शेतात जाताे, असे सांगून घरून निघून गेला. मात्र बराच वेळ हाेऊनही परत न आल्याने त्याच्या वडिलांनी सावरगाव पाेलीस चाैकीत बुधवारी प्रवीणच्या बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविली. दरम्यान, गुरुवारी सकाळच्या सुमारास प्रवीणचे मामा शेतात गेले असता, शेतातील विहिरीत प्रवीणचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी लगेच पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. घटनेचा तपास सावरगाव चाैकीचे पाेलीस हवालदार धनराज भुक्ते करीत आहेत.