जलालखेडा : तरुणाने शेतात कुणीही नसताना विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील झाेलवाडी शिवारात नुकतीच घडली.
मयूर प्यारेलाल खरपुरिया (२८, रा. झाेलवाडी, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. तो स्वत:च्या शेतात काम करण्यासाठी गेला हाेता. दरम्यान, शेतात कुणीही नसल्याचे पाहून त्याने विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्याची प्रकृती खालावल्याने ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी मयूरला लगेच काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस नाईक प्रज्याेत तायडे करीत आहेत.