लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : अनियंत्रित भरधाव बाेलेराे वाहनाने ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नागपूर-जबलपूर महामार्गावरील आमडी फाटा परिसरात शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
मंगेश यादाेराव गावंडे (३०, रा. दत्त मंदिराजवळ, गाेधनी, ता. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगेश व त्याचे दाेन मित्र दाेन दुचाकींनी रामटेक गडमंदिर येथे दर्शनासाठी गेले हाेते. देवदर्शन आटाेपून मंगेश हा आपल्या एमएच-४०/बीआर-४५९४ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने मनसर-कामठीमार्गे नागपूरला परत येत हाेता. दरम्यान आमडी फाट्यावर देवलापारकडून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच-३६/५४२१ क्रमांकाच्या भरधाव बाेलेराे वाहनचालकाने त्याच्या दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात मंगेश गंभीररीत्या जखमी झाला. अपघातानंतर बाेलेराेचालक वाहन घेऊन नागपूरच्या दिशेने पसार झाला. वाहतूक पाेलिसांनी जखमी मंगेशला कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले.
घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी जुनी कामठी पाेलिसांनी बाेलेराे चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, हे प्रकरण पुढील तपासासाठी पारशिवनी ठाण्यात पाठविणार असल्याचे सांगितले.