बुटीबाेरी : रेल्वे रुळावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यास एका तरुणाचा मृतदेह कटलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्यांतर्गतच्या बाेथली शिवारात गुरुवारी (दि.१८) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
पीयूष तुळशीराम शेंडे (२३, रा. लाेधी पांजरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुटीबाेरी येथील रेल्वे कर्मचारी गुरुवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळाची पाहणी करण्यासाठी गेले असता, बाेथली शिवारात त्यांना एका तरुणाचा मृतदेह कटलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत केशव पितांबर प्रमाणिक रेल्वे प्रबंधक, बुटीबाेरी यांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत तरुणाने त्याची एमएच-४०/यू-०७७५ क्रमांकाची दुचाकी परिसरातील साई कंपनीच्या मागे उभी करून धावत्या रेल्वेसमाेर येऊन त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. बुटीबाेरी पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.