शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

नागपुरात जुन्या वादातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:17 PM

अजनीतील अट्टल गुंडांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केली. अजनीतील सम्राट अशोक गार्डनमध्ये ही थरारक घटना घडली. आरोपींनी मृताच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.

ठळक मुद्देअट्टल गुंडांनी केला गेम : अजनीत दिवसाढवळ्या थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीतील अट्टल गुंडांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केली. अजनीतील सम्राट अशोक गार्डनमध्ये ही थरारक घटना घडली. आरोपींनी मृताच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.पवन ऊर्फ आलू भोसले (वय २४, रा. वसंतनगर), स्रेहांशू बोरकर (वय २२, रा. भगवाननगर) आणि निहाल शंभरकर (वय २३, रा. कुकडे लेआऊट) अशी आरोपींची नावे आहेत. प्रतीक संजय ढेंगरे (वय १९, रा. चंद्रमणीनगर) असे मृताचे नाव आहे.मार्च महिन्यात प्रतीकचा मित्र सूरज बिहारी याच्या वाढदिवशी आरोपी आलूसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होऊ लागल्या. आलू हा कुख्यात गुंड असून, त्याची अजनीत मोठी दहशत आहे. प्रतीक त्याला घाबरत नव्हता. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी कुख्यात आलू प्रयत्न करीत होता. तीन दिवसांपूर्वी प्रतीक आणि आलूचे भांडण झाले. यावेळी आलूने प्रतीकला तेरा गेम करूंगा अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास प्रतीक, त्याचा मित्र रुत्विक नत्थू बोरकर (वय २१) आणि अन्य एक असे तिघे गार्डनमध्ये गप्पा करीत होते. आलूला त्याची कुणकुण लागताच तो, शंभरकर आणि बोरकर असे तिघे तेथे आले. आलूने प्रतीकला थापड मारली. प्रतीकने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्या छातीवर चाकूचे घाव घातले. तो पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी त्याच्या पायावर लाकडी फटके मारले. हृदयाजवळ घाव बसल्याने प्रतीक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ते पाहून मदतीसाठी धावलेल्या रुत्विक आणि अन्य एकावरही आरोपींनी लाकडी फळीचे फटके मारून त्यांना पळवून लावले. हे थरारक हत्याकांड घडले तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी होती. मात्र, कुणीही मदतीला धावले नाही.मृतदेह उचलून नेलाप्रतीक रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. तो कोणतीही हालचाल करीत नव्हता. आरोपींनी त्याला आपल्या दुचाकीवर मध्ये बसवले आणि मेडिकलच्या परिसरात नेऊन फेकल्यानंतर ते पळून गेले. दरम्यान, दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. मोठ्या संख्येत नागरिकांनी गार्डनमध्ये धाव घेतली.त्यानंतर जमाव मेडिकलकडे पोहचला. दरम्यान, माहिती कळताच अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये आपल्या ताफ्यासह पोहचले. पाठोपाठ पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनीही धाव घेतली. उपायुक्त भरणे यांनी आरोपींच्या शोधासाठी लगेच विविध भागात पोलीस पथके रवाना केली. रात्रीपर्यंत आरोपींची शोधाशोध सुरू होती. दरम्यान, तरुण मुलाच्या हत्येमुळे प्रतीकच्या कुटुंबीयांवर जबर मानसिक आघात झाला आहे. चंद्रमणीनगरातही यामुळे तणाव तसेच शोककळा पसरली आहे.दहशत पसरविण्यासाठी गुन्हाकुख्यात आलू २०१२ पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार, खंडणी वसुली, शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शंभरकरविरुद्ध चार तर बोरकरविरुद्ध दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंदे करणारे आणि त्यांच्या आश्रयाने सक्रिय असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम उघडकी. त्यामुळे या भागातील अनेक कुख्यात गुन्हेगार पळून गेले. काही कारागृहात आहेत. परिणामी या भागात आपली दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्यातून खंडणी वसुली करता यावी यासाठी कुख्यात आलू आणि त्याच्या साथीदारांनी प्रतीकचा गेम केल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून