अजय संचेती : ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चा समारोपनागपूर : विदर्भातील तरुणांमध्ये वेगळे काही तरी करून दाखविण्याची क्षमता आहे. वेळोवेळी तरुणाईने ते सिद्धदेखील केले आहे. विदर्भातील तरुण उद्योजकांनी आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गरुडझेप घ्यावी, असे मत खासदार अजय संचेती यांनी व्यक्त केले. ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चा सोमवारी समारोप झाला. यावेळी मानकापूर क्रीडा संकुलाच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी महापौर प्रवीण दटके, ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’चे मुख्य संयोजक आ. अनिल सोले, सहसंयोजिका राणी द्विवेदी, माजी उपमहापौर संदीप जाधव, दिलीप गौर, संजय ठाकरे, कृष्णा कावडे, महेंद्र राऊत, नवनीतसिंह तुली यांची उपस्थिती होती. तरुणांमध्ये जिद्द आणि संकल्पना आहेत. मात्र या संकल्पनांना प्रत्यक्षात कसे साकार करावे, ही माहिती तरुणाईला नाही. या ‘युथ समिट’च्या माध्यमातून त्यांना मौलिक मार्गदर्शन मिळत आहे. हा प्रवास असाच सुरू राहावा, अशी अपेक्षा संचेती यांनी बोलून दाखविली. कुठल्याही उद्योगाची सुरुवात एकदम भव्य प्रमाणात होत नाही. जिद्दीतूनच लहान उद्योग मोठा होतो. त्यामुळे लहान उद्योगाची स्थापना केली तरी मनात आत्मविश्वास बाळगून तरुणांनी काम करावे, असे आवाहन प्रवीण दटके यांनी केले. यावेळी त्यांनी नागपूर व विदर्भातील विविध यशस्वी उद्योजकांचे उदाहरण तरुणांसमोर ठेवले. कार्यक्रमाची प्रस्तावना आ. सोले यांनी केली. नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी तयार असणाऱ्यांच्या सदैव पाठीशी राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संदीप जाधव यांनी आभार मानले.
विदर्भातील तरुणांनी आंतरराष्ट्रीय झेप घ्यावी
By admin | Published: February 02, 2016 2:44 AM