लाेकमत न्यूज नेटवर्क
बेला : एसटी महामंडळाच्या मालवाहू वाहनाने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या धाकट्या भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर थाेरला भाऊ किरकाेळ जखमी झाला. ही घटना बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील साेनेगाव (लाेधी) शिवारात नुकतीच घडली.
अमाेल राजेंद्र बिरे (३३) असे मृताचे तर विकास राजेंद्र बिरे असे जखमीचे नाव आहे. दाेघेही सख्खे भाऊ असून, दाेघेही खापा (मानकर), ता. केळापूर, जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहेत. ते एमएच-३६/डी-१३२६ क्रमांकाच्या माेटरसायकलने हिंगणघाट (जिल्हा वर्धा) येथून नागपूरला येत हाेते. दरम्यान, साेनेगाव (लाेधी) शिवारात एसटी महामंडळाच्या एमएच-०७/सी-७५१६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला धडक दिली. यात अमाेलला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विकास किरकाेळ जखमी झाला.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून अमाेलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. उपचार केल्यानंतर विकासला सुटी देण्यात आली. याप्रकरणी बेला पाेलिसांनी दिलीप तुकाराम कडू, रा. साेनेगाव (लाेधी), ता. नागपूर (ग्रामीण) यांच्या तक्रारीवरून वाहनचालक निळकंठ देवराव घाेडाम, रा. दाभा याच्याविराेधात भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनंचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक तथा ठाणेदार पंकज वाघाेडे करीत आहेत.