युवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:40 PM2020-09-30T22:40:19+5:302020-09-30T22:41:21+5:30
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काही समाजकंटकांची शिकार झालेली मनीषा वालमिकी या तरुणीचा दहा दिवसानंतर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेविरोधात शहर युवक काँग्रेसकडून आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काही समाजकंटकांची शिकार झालेली मनीषा वालमिकी या तरुणीचा दहा दिवसानंतर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेविरोधात शहर युवक काँग्रेसकडून आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला.
युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष वसीम खान, मो फ़िरोज़ खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान देशात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप करण्यात आला. यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच मुख्यमंत्री योगी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात ब्लॉक अध्यक्ष गोपाल पट्टम, युवक काँग्रेस महासचिव नवेद शेख, सरफ़राज़ खान, आदिल शेख, सुल्तान खान, पवन चांदपूरकर, संकेत जामगड़े, इसरत खान, समीर कुरेशी, तौफीक पटेल, शाहिद खान, रज़ा, सज्जू, शब्बू, सागर कोरती, अरशद अली आदी सहभागी झाले होते.